russian preparation for possible aerial attack on ukraine see satellite pics
युक्रेनवर हवाई हल्ल्यासाठी रशियाचं सैन्य सज्ज; सॅटलाइट फोटोंमधून मिळाले संकेत! By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 8:37 PM1 / 9युक्रेन आणि रशियातील तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनीही रशिया येत्या आठवड्यात युक्रेनवर हवाई हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली होती. रशियाकडून युक्रेनची राजधानी कीव निशाण्यावर असल्याचं समोर आलं आहे. बायडन म्हणाले की रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीय. 2 / 9रशियातील सोशल मीडियावर देखील पॅराशूटनं सज्ज असलेले एअरबोर्न कॉम्बेट कॅरिअरची तयारी सुरू असलेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. सॅटलाइटच्या माध्यमातून मिळविण्यात आलेल्या फोटोंमध्ये सुखोई-२५ ग्राऊंड अटॅक एअरक्राफ्टसोबतच हेलिकॉप्टर, एस-४०० हवाई सुरक्षा प्रणाली, यूएव्हीसोबतच पायदळ देखील बेलारुस येथे युक्रेनच्या सीमेपासून केवळ ५० किमी दूरवर सज्ज असल्याचं दिसून येत आहे. 3 / 9सुखोई एसयू-२५ ला फ्रॉगफूटच्या नावानंही ओळखलं जातं. रशियाची जमीन हल्ला करणाऱ्या रेजिमेंटचा आधार बनली आहे यात ३२ एसयू-२५ जेट सारखे सॅटलाइट फोटोंमध्ये लूनिनेट्स एअरफिल्डवर स्पष्ट स्वरुपात दिसून येत आहेत. 4 / 9रशियाकडून हवाई क्षेत्राचं एस-४०० अँटी-एअरक्राफ्ट मिसाइल सिस्टमनं संरक्षण केलं जातं आहे. याचा उपयोग लक्ष्याच्या विरोधात देखील केला जाऊ शकतो5 / 9युक्रेनसोबतच सीमेपासून जवळपास २७ किमी पूर्व भागात वलुयकीजवळ २० हून अधिक हेलिकॉप्टर्ससह एक नवं हेलिकॉप्टर युनिट देखील तैनात करण्यात आलं आहे. स्थानिक रिपोर्टनुसार रशियन युनिट्सला ग्राऊंड कॅम्पकडून सपोर्ट केलं जाऊ शकतं. 6 / 9क्रिमियामध्ये डोनुज्लाव येथे जुन्हा हवाई अड्ड्यावर हेलिकॉप्टर्स तुकड्या दाखल झाल्याचं दिसून आलं आहे. १८ फेब्रुवारी रोजी टिपण्यात आलेल्या सॅटलाइट इमेजमधून हे स्पष्ट झालं आहे. 7 / 9इमेजमध्ये संबंधित ठिकाणी आधीपासूनच सैनिक आणि युद्ध शस्त्रास्त्र तैनात असल्याचं दिसून आलं आहे. युक्रेनच्या सीमेपासून जवळपास १६ किमी दूरवर मिलरोवो हवाई क्षेत्रात टँक, सैनिक वाहक आणि इतर युद्ध साहित्य घेऊन सज्ज असलेली हेलिकॉप्टर्सची तुकडी दिसून आली आहे. 8 / 9उत्तर पश्चिम बेलारुसमध्ये लिडा हवाई क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नवे लढाऊ हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. याठिकाणी कमीत कमी ५० लढाऊ हेलिकॉप्टर्स आढळून आले आहेत. 9 / 9इतर काही अकाऊंट्सनं दिलेल्या माहितीनुसार ओक्साना मार्चेंको, रशियन समर्थक नेता विक्टर मेदवेदचुक यांच्या पत्नीनं युक्रेन सोडलं आहे. मेदवेदचुक हे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन याचं अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात. अमेरिकनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार रशियानं सीमेवर सैनिकांच्या संख्येत वाढ करुन १ लाख ३० हजार इतकी केली आहे. रशिया आज एक युद्धाभ्यास करणार असून यात बॅलिस्टिक मिसाइल आणि क्रूझ मिसाइलची चाचणी केली जाणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications