शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या देशात भरवली जाते कानशिलात लगावण्याची अनोखी स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 6:08 PM

1 / 5
आतापर्यंत तुम्ही अनेक स्पर्धा ऐकल्या असतील, अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला असेल मात्र आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत अशी स्पर्धा जी सध्या सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय
2 / 5
या फोटोमध्ये आपण पाहत असाल की, निळा शर्ट घातलेला माणूस समोरच्या माणसाला जोरात कानशिलात लगावत आहे. ज्यामुळे समोरचा माणूस खाली पडतो. यानंतर निळा शर्टमधील माणूस ही स्पर्धा विजयी होतो. विविध ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेतील विजेत्यांना 25 ते 30 हजार रुपये बक्षिस दिलं जातं.
3 / 5
आता जर तुम्ही कुठे गर्दीमध्ये लोक एकमेकांना कानाखाली मारताना पाहत असाल तर त्यांच्यात मारहाणीची घटना होत असेल असं नाही, ते कदाचित एका स्पर्धेचा भाग असू शकतं. रशियामध्ये अशी अनोखी स्पर्धा भरवली जाते. रशियाच्या सायबेरियामध्ये स्लॅपिंग चॅम्पियन ऑफ 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.
4 / 5
यामध्ये दोन पुरुष एकमेकांच्या कानशिलात लगावतात. यामध्ये ज्या पुरुषाचा कानशिलात लगावण्याची क्षमता अधिक असते त्याला स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित केले जाते. यामध्ये एका टेबलाच्या दोन्ही बाजूस हे स्पर्धक उभे असतात आणि एकमेकांच्या कानफाटात मारतात
5 / 5
ही स्पर्धा उभी राहून खेळली जाते. यामध्ये स्पर्धकांनी एक हात टेबलावर ठेवावा लागतो तर दुसऱ्या हाताने प्रतिस्पर्धकाला जोरदार कानफाटात मारायची असते. स्पर्धेत दोघांना समसमान संधी दिली जाते.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय