शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...तर महास्फोटाची शक्यता, पृथ्वीवर धोक्याची घंटा; चंद्रपूरात आकाशातून पडलेल्या वस्तूचं गूढ उकललं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 8:02 PM

1 / 10
अलीकडेच महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि मध्य प्रदेशातील काही भागात आकाशातून धातूची रिंग व दोन मोठ्या गोलाकार वस्तू पडल्या. आकाशातून काही लाल रंगाच्या वस्तू पृथ्वीकडे वेगाने येत असल्याचे नागरिकांना दिसले. अनेकांनी याचे चित्रीकरणही केले.
2 / 10
या गूढ प्रकाशाबाबत खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडॉवेल यांनी सांगितले की, प्रत्यक्षात हा चिनी रॉकेटचा ढिगारा होता जो पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करत होता. आपल्या पृथ्वीच्या कक्षेत अशाच प्रकारचे ढिगारे मोठ्या प्रमाणात आहेत.
3 / 10
बर्‍याचदा या ढिगाऱ्याचे तुकडे जळत जमिनीवर पडतात, जे काहीवेळा रहिवासी भागात पडल्यावर मोठे नुकसान होते. ढिगाऱ्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, जसे की, अवकाशात भंगार कुठे जमा होतो, या ढिगाऱ्यापासून काय नुकसान होते आणि उपग्रहाच्या भंगारामुळे अवकाशात अडथळा निर्माण झाला आहे का?
4 / 10
'अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल डेब्रिज' हे प्रक्षेपण किंवा अवकाशयानाच्या तुकड्यांपासून बनलेले असते जे पृथ्वीवर शेकडो किलोमीटर वर तरंगते. स्पेस स्टेशन आणि उपग्रह यांच्यावर कचऱ्याचे महाकाय तुकडे आदळण्याचा धोका नेहमीच असतो. अवकाशातील स्फोटांमुळे किंवा अनेकदा देशांनी केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे किंवा स्वतःचे उपग्रह नष्ट करूनही कचरा निर्माण होतो.
5 / 10
रशिया, चीन, अमेरिका आणि भारत हे देश आपले उपग्रह नष्ट करतात त्यामुळे अवकाशात कचरा जमा होतो. हा ढिगारा यासाठी धोकादायक आहे कारण, तो २५,२६५ किमी/तास वेगाने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत फिरतो. हा वेग कोणताही महास्फोट घडवून आणण्यासाठी पुरेसा आहे.
6 / 10
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अवकाश कक्षेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक उपग्रहामध्ये खगोलीय भंगार बनण्याची क्षमता असते.' एलन मस्कच्या स्टारलिंकसारखे प्रकल्प अवकाशातील कचरा अनेक पटींनी वाढवू शकतात. यूएस सरकारच्या म्हणण्यानुसार, सॉफ्टबॉलपेक्षा मोठ्या ढिगाऱ्याचे सुमारे २३,००० तुकडे पृथ्वीभोवती फिरत आहेत.
7 / 10
१ सेमी पेक्षा मोठ्या ढिगाऱ्याचे ५ मिलियन तुकडे आहेत आणि १ मिमी किंवा त्याहून मोठ्या ढिगाऱ्याचे सुमारे १०० मिलियन तुकडे कक्षेत आहेत. ISS जवळील ढिगाऱ्यांचे तुकडे दिवसातून १५-१६ वेळा पृथ्वीभोवती फिरतात, ज्यामुळे टक्कर होण्याचा धोका वाढतो.
8 / 10
युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) चा अंदाज आहे की, पृथ्वीच्या कक्षेतील सर्व स्पेस ऑब्जेक्ट्सचे एकूण वस्तुमान ९६०० टनांपेक्षा जास्त आहे. ईएसएचे होल्गर क्रेग एका मुलाखतीदरम्यान म्हणाले, 'जर मलबा असाच वाढत राहिला, तर एके दिवशी अवकाशातील एक भाग पूर्णपणे निरुपयोगी होईल.
9 / 10
६०० किमी पेक्षा कमी उंचीच्या कक्षेत असलेला ढिगारा काही वर्षांत पृथ्वीवर पडेल असं नासाचं म्हणणे आहे. परंतु १००० किमी पेक्षा जास्त उंचीवर असलेला कचरा सुमारे एक शतक किंवा त्याहून अधिक काळ पृथ्वीभोवती फिरत राहील. या ढिगाऱ्यासाठी उपग्रह प्रामुख्याने जबाबदार आहेत, ज्यांचे गर्दी पृथ्वीच्या कक्षेत वाढत आहे.
10 / 10
हे सर्व उपग्रह वेगवेगळ्या देशांतील ५० वेगवेगळ्या ऑपरेटर्स किंवा स्पेस एजन्सीद्वारे चालवले जातात. एलन मस्कची कंपनी SpaceX (1655) अंतराळात सर्वाधिक उपग्रह आहेत. याशिवाय चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे १२९, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे १२५, नासाचे ६०, इस्रोचे ४७ आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे ४५ सॅटेलाईट कक्षेत आहेत.
टॅग्स :NASAनासा