Saturn-like Ring will also occur around the earth, Why and how, This is reason
पृथ्वीभोवतीसुद्धा निर्माण होणार शनीसारखे कडे, का आणि कसे? हे आहे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 2:10 PM1 / 8आपल्या सूर्यमालेतील शनी ह्या ग्रहाबाबत शास्त्रज्ञांसोबतच सर्वसामान्यांच्या मनातही कुतुहल आहे. शनीभोवती असलेले गोल कडे या ग्रहाबाबतचे आकर्षण वाढवतात. समजा, या शनी ग्रहाप्रमाणेच पृथ्वीभोवतीही कडे निर्माण झाले तर... 2 / 8आता पृथ्वीभोवतीही शनी ग्रहाप्रमाणे एक कडे निर्माण होणार असल्याची भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याचं कारण म्हणजे हे कडे शनी ग्रहाप्रमाणे नैसर्गिक नसेल. तर ते अंतराळातील मानवनिर्मित कचऱ्यामुळे निर्माण होणार आहे. मानवाने विविध कारणासाठी अंतराळात पाठवलेले उपग्रह, इतर वस्तू यामुळे अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत आहे. या कचऱ्यामुळे काही काळाने पृथ्वीभोवती एक कडे निर्माण होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 3 / 8रशियाने हल्लीच एक अँटीसॅटेलाईट क्षेपणास्त्राचे परीक्षण केले. त्यामुळे अंतराळात उपग्रहाचा कचरा वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. नासा आणि अमेरिकन सरकारने अशी चाचणी घेऊन अंतराळातील समस्या अधिकच गंभीर केल्याचा आरोप केला आहे. या चाचणीमुळे पृथ्वीच्या कक्षेत हजारो लहान लहान तुकडे तयार झाले होते.4 / 8अशा प्रकारचे तुकडे आंतरराष्ट्रीस स्पेस स्टेशन आणि अन्य उपग्रहांच्या भूस्थिर कक्षेत कचऱ्याची समस्या वाढवत आहे. त्यामुळे या स्टेशनवरील अमेरिकन, रशियन आणि चिनी अंतराळवीरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अंतराळातील हा कचरा कमी करण्यासाठी संशोधकांकडून उपाय शोधले जात आहेत. 5 / 8नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार संशोधकांनी त्यासाठी एक पर्याय सूचवला होता. त्यांनी मॅग्नेटच्या माध्यमातून अंतराळातील कचरा कमी कऱण्याचा प्रस्ताव दिला आहे. आतापर्यंत यासाठी रोबोचा उपयोग करण्याचा विचार सुरू होता. 6 / 8अॅबोट यांनी सांगितले की, फिरणारा कचरा जमा करण्यासाठी रोबोचा वापर करणे अव्यावहारिक ठरेल कारण या कचऱ्याच्या तुकड्यांमध्ये रोबोचे हात तोडण्याची क्षमता आहे. त्यामुळे या माध्यमातून अजूनच कचरा जमा होईल. मात्र मॅग्नेट व्यावहारिकदृष्या अखि व्यावहारिक ठरेल, त्यामधून कचरा निर्माण होण्याचा धोका नसेल. तसेच धातूपासून न बनवलेला कचराही स्वच्छ होईल, असे अॅबोट यांना सांगितले.7 / 8युरोपीय स्पेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार अंतराळात १७ कोटी कचऱ्याचे तुकडे असे आहेत, ज्यांचा आकार १ मिमीपेक्षा अधिक आहे. जिथे मोठे तुकडे एका सॅटेलाईटला आदळून त्याला नष्ट करू शकतात. हे छोटे तुकडे अंतराळातील आवश्यक सिस्टिमला बिघडवू शकतात. अंतराळातील काही तुकडे कधी कधी पृथ्वीवर पडल्याचीही नोंद आहे. 8 / 8खगोलतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सुमारे १९ हजार तुकडे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत आहेत. ही कक्षा पृथ्वीपासून २०० ते २००० किमीपर्यंत स्थित आहे. अंतराळातील सर्व कचऱ्याचे मिळून सुमारे ७ हजार ५०० मेट्रिक टन एवढे भरेल, जे सुमारे ११०० हत्तींच्या वजनाएवढे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications