Saudi Arabia Helps Pakistan: Pakistan ने हात पसरले; सौदी अरेबियानं Imran Khan यांच्या झोळीत टाकलं ३ अब्ज डॉलर्सचं दान By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 9:05 AM1 / 10Saudi Arabia Help To Pakistan State Bank: सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. जागतिक बँकेपासून (World Bank) आयएमएफपर्यंत (IMF) कर्ज मिळण्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांच्या पदरी निराशा पडली आहे. 2 / 10सर्व ठिकाणाहून निराशा झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे धाव घेतली. दरम्यान, यानंतर स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या विदेशी नाणेनिधीला मदत करण्यासाठी ३ अब्ज डॉलर्स जमा करणार आहे. 3 / 10पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना सौदी अरेबियाने पाकिस्तानला हा मोठा दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तान आपल्याला कर्ज मिळण्यासाठी प्रयत्नशील होता.4 / 10सौदी फंडाकडून एक अधिकृत निर्देश जारी करण्यात आला असल्याचंही सौदी फंडानं सांगितलं. याअंतर्गत पाकिस्तानला तेल उत्पादनांच्या व्यापारासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी यावर्षी १.२ अब्ज दिले जाणार असल्याची माहिती पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजनं दिली आहे.5 / 10पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून ही मदत पुरवली जाणार असल्याच्या वृत्ताला पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी आणि ऊर्जा मंत्री हमद अजहर यांनी दुजोरा दिला आहे. 'यामुळे जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे व्यापार आणि परकीय चलन निधीवर निर्माण झालेला दबाव कमी होण्यास मदत होईल,' असं अझहर यावेळी म्हणाले. 6 / 10यापूर्वी मे महिन्यात फवाद चौधरी म्हणाले होते की सौदी अरेबियाने पाकिस्तानसाठी कच्च्या तेलाची सुविधा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. यापूर्वी इम्रान खान यांनी आपल्या अन्य दौऱ्यात सौदी अरेबियाला तेल पुरवठ्याबाबत विनंती केली होती.7 / 10यापूर्वी कर्ज घेऊन कर्ज फेडणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं मोठा झटका दिला होता. त्यांनी पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सचं कर्ज देण्यास नका दिला. आयएमएफला मनवण्यासाठी इम्रान खान सरकारनं वीज आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात मोछी वाढही केली. परंतु त्यानंही फरक पडला नाही.8 / 10आयएमएफकडे कर्ज मागण्यासाठी गेलेल्या इम्रान खान यांच्या पदरी निराशाच आली. त्यानंतर इम्रान खान यांना पुन्हा एकदा सौदी अरेबियाच्या समोर हात पसरावे लागले. दरम्यान, पाकिस्तान सरकारच्या हात पसरण्यानंतर बुडत्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी आयएमएफनं ६ अब्ज डॉलर्सचा एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी दिली होती. 9 / 10याअंतर्गत पुढील टप्प्यात पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्स देण्यात येणार होता. पाकिस्तानी माध्यमांनुसार पाकिस्तान सरकार आणि आयएमएफ दरम्यान याबाबत कोणती चर्चा झाली नाही. यापूर्वी इम्रान खान सरकारनं परदेशातून कर्ज न घेण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु आता पाकिस्तानवर असलेलं कर्ज फेडण्यासाठी पाकिस्तानला परदेशातूनच कर्ज घ्यावं लागत आहे.10 / 10प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर आता १ लाख ७५ हजार रूपयांचं कर्ज असल्याची कबुली संसदेत इम्रान खान सरकारनं दिली. गेल्या दोन वर्षांमध्ये पाकिस्तानवरील कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इम्रान खान यांनी सत्ता हाती घेतली तेव्हा प्रत्येक नागरिकावर १२००९९ रूपयांचं कर्ज होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications