saudi arabia uae china are not lending loan to pakistan until imf approves loan might default
आधी दिलेले पैसे उडवले! पाकिस्तान पुन्हा मदत मागायला दारावर गेला; सौदी, युएई, चीनने हाकलवून लावले By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 3:24 PM1 / 6एकीकडे परकीय चलनाच्या साठ्याअभावी आणि वाढत्या विदेशी कर्जामुळे पाकिस्तानची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. अशातच दुसरीकडे त्यांना आता परदेशातून कर्ज घेणेही कठीण होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानला आर्थिक पॅकेज देण्यास टाळाटाळ करत आहे आणि अनेक कठोर अटीदेखील ठेवत आहे.2 / 6अशा परिस्थितीत पाकिस्तानचे जवळचे मित्र मानले जाणारे देशही त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. खुद्द पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.3 / 6अडचणीत असलेल्या पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी आता मित्र देश सावधपणे पुढे जात आहेत, अशी माहिती पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी दिली. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मंत्री मिफ्ताह इस्माइल म्हणाले, 'आम्ही सौदी अरेबिया, यूएईला गेलो आणि इतर अनेक देशांशी चर्चा केली आहे. त्यांनी मदत करण्यास तयारीही दर्शवली. परंतु त्यांनी प्रथम आयएमएफकडे जाणं आवश्यक असल्याचं म्हटलं.4 / 6चीनच्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेनेही पाकिस्तानला कर्ज देण्यास नकार दिला जागतिक बँकेने कर्ज दिले तरच ते कर्जाच्या स्वरूपात पाकिस्तानला मदत करेल, असं सांगण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक जगातील सर्वात मोठ्या कर्जदात्यांशी स्पर्धा करण्यासाठी तयार करण्यात आली.5 / 6२०१८ मध्ये पाकिस्तानवर अशीच परिस्थिती ओढावली होती. तेव्हा त्याच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या देशांनी पाकिस्तानला आर्थिक मदत केली होती. आयएमएफमध्ये जाण्यापूर्वी चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडे आर्थिक मदत मागितली होती. तेव्हा त्यांना मदतही करण्यात आली होती. परंतु आता हे देश पाकिस्तानला कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे.6 / 6या देशांकडून पाकिस्ताननं यापूर्वी कर्ज घेतलं होतं. परंतु त्यांना ते फेडता आलं नाही. जून २०२२ च्या अखेरिसपर्यंत पाकिस्तान ४.८८९ अब्ज डॉलर्सचं कर्ज देय आहे. परंतु कमी होत चाललेल्या पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यामुळे हे शक्य नसल्याचं सेंट्रल बँक ऑफ पाकिस्ताननं सांगितलं होतं. जर पाकिस्तानला परदेशातून कर्ज मिळालं नाही तर ते कर्ज फेडता येणार नाही आणि देश डिफॉल्टर होईल, असंही ते म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications