काका मला वाचवा! सौदीची राजकुमारी तुरुंगात खितपत; क्राऊन प्रिन्ससोबत वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 09:28 IST
1 / 11सौदी अरेबियाची राजकुमारी गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात खितपत आहे. याबाबत त्यांनी स्वत:च ट्विट करून माहिती दिली आहे. यामुळे लोकांमध्ये उत्सुकता वाढली असून आतापर्यंत शाही परिवाराला याची माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न पडला आहे. 2 / 11राजकुमारीचे नाव बस्मा बिंते सऊद आहे. तिने किंग सलमान बिन अब्दुल आजीज आणि क्राऊन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान यांच्याकडे सुटकेची विनंती केली आहे. 3 / 11बस्मा हिने म्हटले आहे की, तिची तब्येत खराब होत आहे. यामुळे तिचा मृत्यूही होऊ शकतो. तुरुंगात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा मिळत नाहीय. वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यू होण्याची भीती तिने ट्विटरवर लिहिली होती. मात्र, तिने हे ट्विट लगेचच डिलीट केले आहेत. 4 / 11बस्मा या ५६ वर्षांच्या आहेत. १९५३ ते १९६४ पर्यंत सौदीवर राज्य करणाऱ्या शाह सऊद यांची ती धाकटी मुलगी आहे. 5 / 11किंग सलमान नात्यामध्ये बस्माचे काका आणि क्राऊन प्रिन्स चुलत भाऊ लागतात. बस्मा ही सौदीच्या संस्थापकांची नात आहे. 6 / 11सौदीमध्ये अशा कमी महिला आहेत ज्या समोर येऊन त्यांचे म्हणणे मांडतात. राजकुमारी बस्मा त्यापैकीच एक आहेत. सौदीमध्ये बदल व्हावेत यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख येत होते. महिलांच्या अधिकारावर त्या बोलत असत. बस्मा या मानवाधिकार वकील असून हाऊस ऑफ सौदीच्या सदस्या आहेत. 7 / 11२०१८ मध्ये त्यांनी येमेन युद्धाची कडक निंदा केली होती. तसेच युद्ध संपविण्याची विनंतीही केली होती. या युद्धाचे सर्वात मोठे समर्थक दुसरे कोणी नाही तर क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान होते. 8 / 11यानंतर राजकुमारी बस्मा २०१९ च्या सुरुवातीच्या महिन्यांपासून बेपत्ता झाली होती. त्यांना फेब्रुवारी २०१९ मध्ये अटक करण्यात आल्याच्या बातम्या होत्या. 9 / 11पहिल्यांदा त्यांनी १६ एप्रिलला ट्विट केले आणि काहीतरी कारणावरून तुरुंगात टाकल्याचे सांगितले. तसेच किंग आणि क्राऊन प्रिन्सला तिच्यावरील आरोपांची सुनावणी घ्यावी, जर कोणतीही चूक नसेल तर तुरुंगातून सोडावे असे तिने म्हटले होते. 10 / 11राजकुमारीने सांगितले की, तिला तिच्या मुलीसोबत कोणत्याही गुन्ह्याशिवाय अल हायर तुरुंगात कैद करण्यात आले आहे. अनेकदा तब्येत खालवल्याचे पत्र तुरुंग आणि रॉयल कोर्टाला दिलेले आहे. मात्र, कोणतेही उत्तर आलेले नाही. 11 / 11बीबीसीनुसार सौदीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तर गेल्या काही वर्षांत अनेक सौदीच्या राजकुमारांना आणि राजघराण्यातील व्य़क्तींना क्राऊन प्रिन्सने तुरुंगात डांबले आहे.