SCO Summit 2022 | PM Narendra Modi Samarkand Speech; Clear Message For China and Pakistan
SCO Summit 2022: शिखर परिषदेत मोदी कडाडले; पाकिस्तान-चीनच्या प्रमुखांसमोर थेट सुनावले... By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 5:24 PM1 / 9 SCO Summit 2022: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन(SCO) मध्ये सहभाग नोंदवण्यसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उझबेकिस्तानमध्ये गेले आहेत. या महत्त्वाच्या परिषदेत पंतप्रधान मोदी काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. समरकंदमध्ये 4 मिनिटे 49 सेकंदांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी कोणत्याही देशाचे नाव न घेता थेट संदेश दिला. विशेषतः चीन आणि पाकिस्तानला मोदींनी यावेळी सुनावले. 2 / 9 यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी आम्ही प्रगती करत आहोत. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असलेली भारताची अर्थव्यवस्था यावर्षी 7.5 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रात नवनिर्मितीला पाठिंबा देत आहोत. आज भारतात 70 हजार स्टार्टअप्स आहेत, त्यापैकी 100 हून अधिक युनिकॉर्न आहेत.3 / 9 आमचा हा अनुभव अनेक SCO सदस्यांनाही उपयोगी पडू शकतो.' यातून मोदींनी चीनवर निशाणा साधलाय. खरं तर, स्टार्टअप्सच्या माध्यमातून भारत तुलनेने स्वस्त वस्तू आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगती वस्तू बनवून जगाला आकर्षित करत आहे. अॅपल कंपनी आता चीनऐवजी भारतात आपली उत्पादने बनवण्यास प्राधान्य देत आहे.4 / 9 कोरोना काळात अनेक मोठ्या कंपन्यांनी चीनमधून व्यवसाय गुंडाळून भारतासह इतर देशांमध्ये हलवला. सहज आणि स्वस्त मनुष्यबळाच्या बळावर भारतात मागे टाकण्याची क्षमता आहे, हे चीनला चांगलेच ठाऊक आहे. एवढेच नाही तर दक्षिण आशियातील शांततेसाठी पंतप्रधान मोदींनी चीनचे नाव न घेता सुनावले.5 / 9ते म्हणाले की, 'भारत SCO देशांमधील परस्पर विश्वास आणि सहकार्याचे समर्थन करतो.' दरम्यान, चीन गेल्या काही काळापासून LAC वर आपल्या लष्करी हालचाली वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत पीएम मोदींचे हे वक्तव्य चीनसाठी कडक संदेश मानले जात आहे. पंतप्रधान मोदींनी या बैठकीत पाकिस्तानलाही नाव न घेता सुनावले. 6 / 9 PM मोदी म्हणाले की, 'SCO ने या भागात पुरवठा साखळी तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासोबतच चांगली कनेक्टिव्हिटी आणि एकमेकांना ट्रांझिट अधिकार देणे महत्त्वाचे आहे.' यावेळी मोदींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानने अफगाणिस्तानला मदत देणे बंद केल्याचा उल्लेख केला. अफगाणिस्तानला मदत रोखल्याबद्दल पंतप्रधानांनी पाकिस्तानला खूप सुनावले. मोदींचे ऐकून झाल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा शांतता आणि दहशतवादाचे गोडवे गायले.7 / 9 यावेळी मोदींनी मित्रराष्ट्र असलेल्या रशियालाही संदेश दिला. मोदी म्हणाले की, 'महामारी आणि युक्रेनमधील संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीत अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाला प्रचंड ऊर्जा आणि अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे. SCO ने आमच्या प्रदेशात विश्वसनीय पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.8 / 9 यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटीची आवश्यकता असेल.' खरं तर, भारताने सुरुवातीपासूनच युक्रेन युद्धाबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. जगाच्या प्रत्येक व्यासपीठावर भारताने परस्पर संवादातून वाद सोडवण्याचा आग्रह धरला आहे. अशा परिस्थितीत युक्रेन युद्धाचा उल्लेख करून त्यांनी अप्रत्यक्षपणे रशियालाही संदेश दिला आहे.9 / 9 SCO ची सुरुवात शांघाय येथे जून 2001 मध्ये झाली आणि त्यात आठ सदस्य आहेत. यात सहा संस्थापक सदस्य चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये पूर्ण सदस्य म्हणून त्यात सामील झाले. SCO ही सर्वात मोठी आंतर-प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून उदयास आली आहे. समरकंद शिखर परिषदेत इराणला SCO च्या स्थायी सदस्याचा दर्जा दिला जाण्याची शक्यता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications