Sea Of Stars:you too will be amazed to see stars in 'Sea of Stars' in maldives
Sea Of Stars: मालदीवच्या समुद्रात उतरतात तारे, 'सी ऑफ स्टार्स' पाहून तुम्हीही व्हाल चकीत... By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 2:44 PM1 / 9 फिरायची आवड असणाऱ्यांसाठी प्रवासच सर्वकाही असतो. फिरणाऱ्यांना विविध ठिकाणी जायला आवडतं. कोरोनामुळे भलेही आता फिरण्यास बंदी असेल, पण परिस्थिती सुधारल्यानंतर फिरायची आवड असणारे बॅग घेऊन भ्रमंतीवर निघतील. तुम्हालाही फिरायची आवड असेल, तर आम्ही तुम्हाला अशी जागा सांगणार आहोत, जिथे प्रत्यक्षात तारे जमिनीवर उतरतात.2 / 9 मालदीवमध्ये 'सी ऑफ स्टार्स' नावाचे एक बीच आहे. या बीचचे सौंदर्य पाहून, तुम्हाला या बीचवरुन परत यावंच वाटणार नाही.3 / 9 तुम्हालाही समुद्रकिनारी बसणे आणि शांत वातावरण आवडत असेल, तर हे बीच तुम्हाला नक्की आवडेल.4 / 9 या बीचवर रात्रीच्या वेळेस निळ्या रंगाचे तारे दिसतात, ज्यामुळेच या बीचला 'सी ऑफ स्टार्स' म्हटले जाते.5 / 9 पण, हे तारे प्रत्यक्षातले तारे नसून, समुद्रामधले सुक्ष्मजीव आहेत. एका रासायनिक प्रक्रियमुळे या सुक्ष्मजीवांचा रंग निळा होतो.6 / 9 रात्रीच्या वेळे काळाकुट्ट अंधार झाल्यानंतर हे सुक्ष्मजीव चमकतात आणि निळ्या रंगाचे दिसतात.7 / 9 काही पर्यटक या ठिकाणी या सुक्षमजीवांसोबत अंघोळीचाही आनंद घेतात. या दृष्याची मजा अनुभवण्यासाठी तुम्ही समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलमध्ये थांबू शकता.8 / 9 मालदीवमधील वाधू आयलंडवर निळाशार समुद्राचे दृष्य पाहून तुम्हीही चकीत व्हाल आणि या ठिकाणावरुन परत यावंच वाटणार नाही.9 / 9 कोरोना काळ संपल्यावर तुम्ही फिरण्याचा विचार करत असाल, तर ही जागा तुमच्यासाठी एकदम चांगली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications