secret weapon from Thailand that can change the future of Mumbai
मुंबईची तुंबई होण्यापासून रोखण्याचा थायलंड पॅटर्न By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 3:05 PM1 / 12नेमेचि येतो पावसाळा अन् नेमेचि होते मुंबईची तुंबई. पाऊस येणं आणि मुंबई तुंबणं हे जणू समीकरणच. मुंबई तुंबल्यानं वाहतूक ठप्प होतेच. शिवाय अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं.2 / 12मुंबईची भौगोलिक रचना पाहिल्यास या शहराची मर्यादा संपली आहे. अनेक ठिकाणी झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे शहरावर अतिरिक्त ताण पडला आहे. त्यामुळेच प्रत्येक पावसात मुंबई तुंबते. 3 / 12समुद्राच्या पाण्याची पातळीदेखील सातत्यानं उंचावत असल्यानं मुंबई, बँकाँगसारखी शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. ही समस्या दिवसागणिक वाढत असल्यानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 4 / 12काही वर्षांपूर्वी थायलंडदेखील अशाच समस्यांचा सामना करत होतं. मुसळधार पाऊस झाल्यानंतर संपूर्ण शहर पाण्याखाली जायचं. मात्र थायलंडनं एक वेगळाच पॅटर्न राबवला आणि पाण्याचं उत्तम व्यवस्थापन सुरू केलं. 5 / 12प्रसिद्ध वास्तुविद्याविशारद कोट्चाचॉर्न व्होराखॉम यांनी बांधकामात थोडे बदल करत पाण्याच्या व्यवस्थापनाची उत्तम योजना आखली. यामुळे पाणी तुंबण्याची समस्या तर दूर झालीच, सोबतच शहरातलं एक सुंदर प्रेक्षणीय ठिकाणदेखील तयार झालं. 6 / 12हावर्डमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या कोट्चाचॉर्न व्होराखॉम यांनी वातावरणात होणारे बदल, त्याचा शहरांवर होणारा परिणाम, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा अभ्यास करत पाण्याच्या व्यवस्थापनाचा सुंदर आणि कार्यक्षम पॅटर्न तयार केला. 7 / 12कोट्चाचॉर्न व्होराखॉम आणि त्यांची कंपनी लँडप्रोसेस यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या चुलालोंगकोर्न विद्यापीठ सेंटेनरी पार्कमध्ये पाणी साठवण्यासाठी एक जागा तयार केली.8 / 12कोट्चाचॉर्न व्होराखॉम यांनी विद्यापीठाच्या आवारात असलेल्या हिरवळीचा वापर मोठ्या खुबीनं केला. मोकळ्या जागेत उतरंड तयार करून तिथे पाणी साठून राहील, अशी व्यवस्था त्यांनी तयार केली. 9 / 12यामुळे पाणी गवतावर वाहून जाऊ लागलं. बरंचसं पाणी जमिनीत मुरू लागलं. जमिनीत न मुरलेलं पाणी उंतरडीच्या दिशेनं धावू लागतं. या साठलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापरदेखील करता येतो. 10 / 12पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर अशा प्रकारच्या उद्यानांमध्ये कोट्यवधी लीटर पाणी साठवता येतं. त्यामुळे शहरात पाणी साचत नाही. याशिवाय भविष्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास साठवलेलं पाणी वापरात आणता येतं. 11 / 12२०११ मध्ये थायलंडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. पन्नास वर्षांतल्या सर्वात मोठ्या पुरानं थायलंडला झोडपून काढलं. यात जवळपास ८० जणांचा मृत्यू झाला. तर हजारो नागरिक विस्थापित झाले. 12 / 12थायलंडमधील ४० टक्के भूभाग २०३० पर्यंत पाण्याखाली जाऊ शकतो, अशी आकडेवारी त्यानंतर जागतिक बँकनं दिली. त्यानंतर पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी थायलंडनं प्रयत्न सुरू केले. आणखी वाचा Subscribe to Notifications