शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना अन्...; डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकत 'या' सात भारतीयांचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 3:37 PM

1 / 8
सध्याच्या अमेरिकन काँग्रेसमध्ये भारतीय वंशाच्या खासदारांची संख्या पाच होती. या निवडणुकीत सर्व पाच विद्यमान भारतीय अमेरिकन सदस्यांना पुन्हा निवडून देण्यात आले आहे.
2 / 8
डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार सुहास सुब्रमण्यम यांनी व्हर्जिनिया मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुहास सुब्रमण्यम यांनी व्हर्जिनिया आणि संपूर्ण ईस्ट कोस्टमधून निवडले गेलेले पहिले भारतीय व्यक्ती बनून इतिहास रचला. सुब्रमण्यन यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माईक क्लॅन्सी यांचा पराभव केला. ते सध्या व्हर्जिनिया राज्याचे सिनेटर आहेत.
3 / 8
मिशिगनच्या १३व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून श्री ठाणेदार सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. २०२३ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकली होती. त्यांनी रिपब्लिकन प्रतिस्पर्धी मार्टेल बिविंग्सचा ३५ टक्क्यांहून अधिक मतांनी पराभव केला.
4 / 8
ॲरिझोनाच्या पहिल्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून डॉ. अमिश शाह यांनी रिपब्लिकन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध कमी फरकाने आघाडीवर आहेत. मात्र, त्यांचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यांच्याकडे १३२,७१२ मते आहेत तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला मिळालेल्या मतांची संख्या १२८,६०६ होती. आतापर्यंत ६३ टक्के मतांची मोजणी झाली आहे.
5 / 8
व्यवसायाने चिकित्सक असलेल्या डॉ. अमी बेरा हे २०१३ पासून कॅलिफोर्नियाच्या सहाव्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टचे प्रतिनिधीत्व करणारे ज्येष्ठ-सर्वाधिक भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार आहेत. ते सलग सातव्यांदा निवडून आले आहेत.
6 / 8
कॅलिफोर्नियाच्या १७ व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रो खन्ना यांनीही निवडणूक जिंकली आहे.
7 / 8
डेमोक्रॅटिक प्रतिनिधी प्रमिला जयपाल यांनी वॉशिंग्टनच्या यूएस हाऊसमधील सातव्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्ट जागेवरून निवडणूक जिंकली आहे.
8 / 8
डेमोक्रॅटिक काँग्रेसचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी इलिनॉयच्या आठव्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या मार्क राईस यांचा पराभव केला.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारत