शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या तालिबानमध्ये 'या' 7 नेत्यांचा आदेश असतो अंतिम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 4:27 PM

1 / 8
नवी दिल्ली: 20 वर्षांनंतर अमेरिकन सैन्यानं अफगाणिस्तानातून माघार घेताच तालिबाननं आफगाणिस्तानवर आपला ताबा मिळवला. दरम्यान, चीन आणि रशियाने अफगाणिस्तानात तालिबानच्या नव्या सरकारला समर्थन दर्शवलं आहे. आता प्रश्न उद्भवतो की या दहशतवादी संघटनेच्या सरकारचं नेतृत्व कोण करेल ? आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तालिबानमधील काही प्रमुख नेते, ज्यांच्या नेतृत्वातच तालिबाननं अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतलं.
2 / 8
हैबतुल्लाह अखुंदज़ादा- हा माणूस तालिबानचा सर्वोच्च कमांडर आहे. तालिबानमध्ये याचा निर्णय अंतिम मानला जातो. 1961 मध्ये जन्मलेल्या हैबतुल्लाहने 2016 मध्ये तालिबानचा कारभार हाती घेतला होता. त्यापूर्वी तो पाकिस्तानातील मशिदीत शिकवायचा, पण तालिबानच्या संपर्कात आल्यानंतर तो तालिबानी दहशतवादी बनला.
3 / 8
मुल्ला अब्दुल गनी बरादर-हा तालिबानचा उपनेता आणि सर्वात लोकप्रिय चेहरा आहे. बरदार हा तालिबानच्या राजकीय युनिटचा प्रमुख असून, अफगाणिस्ताना राष्ट्राध्यक्ष होण्याच्या शर्यतीत प्रमुख दावेदार आहे. मुल्ला उमरचा सर्वात विश्वासू कमांडर आहे. 2010 मध्ये आयएसआयने कराचीतून त्याला अटक केली होती, पण करारानंतर 2018 मध्ये पाकिस्ताननं सोडून दिलं.
4 / 8
सिराजुद्दीन हक्कानी-हा त्याच्या वडिलांनी स्थापन केलेल्या हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. 2016 मध्ये हक्कानी नेटवर्क तालिबानमध्ये विलीन झाला होता. तो आता तालिबानचा उपनेता आहे. तालिबानची आर्थिक संसाधने हक्कानी सांभाळतो. हा अनेक हाय प्रोफाइल हल्ल्यांसाठी जबाबदार असून, याचे अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड यादीत नाव आहे.
5 / 8
मोहम्मद याकूब-याकूब हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा आहे. तो तालिबानच्या लष्करी विभागाचा प्रमुख असून, तालिबानच्या सध्याच्या नेतृत्वामध्ये अत्यंत संयमी वृत्तीचा नेता म्हणून ओळखला जातो. त्याला तालिबान आणि अल-कायदाच्या मदरशांमध्ये प्रशिक्षण मिळाले आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या देखरेखीखाली त्याने गुरीला ट्रेनिंग आणि शस्त्रांचं प्रशिक्षण घेतलंय.
6 / 8
अब्दुल हकीम हक्कानी-हा तालिबानचा सर्वोच्च वार्ताकार आणि शांतता वार्ता संघाचा सदस्य आहे. हकीम हक्कानी हा तालिबानच्या न्यायिक विभागाचा प्रमुख असून, त्याच्यावर न्यायव्यवस्थेसाठी जबाबदारी आहे. तो न्यायाधीश राहिलेला आहे. तो दोहामधील वाटाघाटी संघाचा प्रमुख होता. तालिबानच्या सर्वोच्च कमांडरचा उजवा हात म्हणून त्याला ओळखलं जातं.
7 / 8
शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजई-हा तालिबान सरकारमध्ये उपमंत्री राहिलेला आहे. स्टेनिकझाई एक कट्टर धार्मिक नेता आणि प्रमुख मुत्सद्दी आहे. हे गेल्या दशकापासून दोहामध्ये राहत असून, 2015 मध्ये त्यांला तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख बनवण्यात आलं होतं. अफगाणिस्तानच्या शांतता वाटाघाटीतील प्रमुख वार्ताकार म्हणूनही त्यान काम पाहिलं आहे. अमेरिकेसोबतच्या शांतता करारातही त्याचा सहभाग होता.
8 / 8
जबीहुल्लाह मुजाहिद-हा तालिबानचा मुख्य प्रवक्ता आहे. तालिबाननं काबूलवर ताबा मिळवल्यानंतर यानेच पहिले मीडिया ब्रीफिंग केलं होतं. अफगाणिस्तानचं नवीन सरकार कसं असेल हे त्यान मीडियाला सांगितलं होतं. 20 वर्षांपासून तो फोन संदेशाद्वारे पत्रकारांशी बातचीत करत आला आहे.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान