Sex & White House: Bill Clinton to Donald Trump
सेक्स आणि व्हाइट हाऊस: बिल क्लिंटन ते डोनाल्ड ट्रम्प By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 5:32 PM1 / 6 व्हाइट हाऊस हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय आणि निवासस्थान. व्हाईट हाऊसच्या प्रत्येक निर्णयाकडे जगाचे लक्ष असते. कारण व्हाइट हाऊसमधून निघालेले फर्मान जागतिक राजकारणात उलथा-पालथ घडवते. पण तेच व्हाइट हाऊस पुन्हा एकदा सेक्सच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहे. 2 / 6दोन दशकांपूर्वी जानेवारीच्या याच आठवडयात माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी राजकीय हानी टाळण्यासाठी आपले कोणत्याही महिलेबरोबर विवाहबाह्य संबंध नसल्याचे म्हटले होते. 3 / 6त्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये इंटरन असलेल्या मोनिका लेविंस्कीबरोबर क्लिंटन यांचे शरीरसंबंध होते. त्यावेळी मोनिका फक्त 22 वर्षांची होती.4 / 6अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल बरोबर सेक्स संबंध ठेवल्याचा आरोप झाला आहे. 5 / 6अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी नोव्हेंबर 2016 मध्ये तोंड बंद ठेवण्यासाठी स्टॉर्मीला पैसे दण्यात आले होते. 6 / 6स्टॉर्मीचे तोंड बंद ठेवण्यासाठी ट्रम्प यांनी 1 लाख 30 हजार डॉलर मोजल्याचा आरोप वॉल स्ट्रीट जनरलने केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications