शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sheikh Hasina : शेख हसीना कोणत्या देशात घेणार राजकीय आश्रय?, 'या' पाच देशांचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 12:53 PM

1 / 8
शेख हसीना यांची सत्ता बांगलादेशमधील हिंसक आंदोलनाने उलथवून लावली. पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून सध्या भारतात आश्रय घेतला आहे. मात्र, त्या भारतात जास्त दिवस राहू शकत नाहीत. त्यामुळं त्यांनी ब्रिटनकडे आश्रय मागितल्याची चर्चा होती. परंतू शेख हसीना यांना ब्रिटननं आपल्या देशात आश्रयसाठी कोणताही नियम नसल्याचे सांगून अप्रत्यक्षरित्या नकार दिल्याचं समजतं.
2 / 8
दुसरीकडं, अमेरिकेनंही शेख हसीना यांचा व्हिजा रद्द केला आहे. त्यामुळं अमेरिकेला जाण्यासाठी त्यांचे दरवाजे बंद झाले आहेत. आता शेख हसीना यांनी आपलं नवीन ठिकाण शोधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शेख हसीना यांची अशा पाच देशांवर नजर आहे. अशा स्थितीत शेख हसीना कुठं राजकीय आश्रय घेणार, याबाबत अद्याप काहीही ठरलं नाही. तर शेख हसीना कोणत्या पाच देशांच्या विचारात आहेत, त्याबद्दल जाणून घ्या.
3 / 8
शेख हसीना यांचे रशियाशी चांगले संबंध आहेत, त्यामुळं त्या रशियात राजकीय आश्रय घेऊ शकतात. पण शेख हसीना यांना रशियामध्ये अनेक समस्या आहेत, कारण त्यांचा मुलगा अमेरिकेत राहतो आणि नातेवाईक इंग्लंडपासून फिनलंडला राहतात. अमेरिकेनं रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत, त्यामुळं रशियात राहिल्यामुळं त्यांना आपल्या मुलाला आणि नातेवाईकांना भेटता येणार नाही.
4 / 8
शेख हसीना ज्या पाच देशांमध्ये विचार करत आहेत, त्यात बेलारूसचाही समावेश आहे. ब्रिटननं राजकीय आश्रय देण्यास नकार दिल्यानं शेख हसीना यांच्यासमोर बेलारूसचा पर्याय आहे. अशा परिस्थितीत अशी चर्चा सुरु आहे की, शेख हसीना बेलारूसला जाऊ शकतात, त्यांचा पुतण्याही बेलारुसला राहतो.
5 / 8
शेख हसीना यांच्या राजकीय आश्रयासाठी कतार हा एक चांगला पर्याय आहे, कारण बांगलादेश आणि कतारमध्ये चांगले संबंध आहेत. यासोबतच कतार यापूर्वीही राजकीय लोकांना आश्रय देत आला आहे. मध्यपूर्वेत असल्यानं कतार बांगलादेशच्याही जवळ आहे. शेख हसीना यांच्यासाठी कतार हा सुरक्षित मुक्काम असू शकतो.
6 / 8
शेख हसीना संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) जाण्याचा विचार करत असल्याचं रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे. त्यांनी यूएई सरकारशी चर्चा सुरू केली आहे. राजकीय व्यक्तींना आश्रय देण्यात यूएईही आघाडीवर आहे. शेख हसीना यांच्यासाठी सुरक्षित आणि चांगला पर्याय असू शकतो. दरम्यान, शेख हसीना यांची यूएईसोबत चर्चा सुरू झाली आहे, मात्र अद्याप कोणतेही मोठे अपडेट मिळालेले नाही.
7 / 8
शेख हसीना यांच्यासाठी फिनलँड देखील सर्वोत्तम पर्याय असू शकतो, कारण हसीना यांचे अनेक नातेवाईक फिनलँडमध्ये राहतात. फिनलँडमध्ये कोणत्याही प्रकारचे अमेरिकन किंवा पाश्चात्य निर्बंध नाहीत. अशा परिस्थितीत त्या आपल्या मुलांना आणि नातेवाईकांना सहज भेटू शकतील.
8 / 8
संबंधित व्यक्तींना आपल्या मातृभूमीत असुरक्षित वाटत असल्यास इतर देशांद्वारे संरक्षण दिले जाते, त्यालाच राजकीय आश्रय किंवा आश्रय म्हणतात. ब्रिटन सरकारच्या म्हणण्यानुसार, व्यक्तींना शरणार्थी म्हणून देशात राहायचं असल्यास आश्रयासाठी अर्ज करावा लागतो. जे लोक त्यांच्या देशातून पळून आले आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळं किंवा असुरक्षिततेची भीती असल्यामुळं परत जाण्यास असमर्थ आहेत, अशी व्यक्ती अर्ज करण्यास पात्र आहे. ब्रिटन सरकारकडं गेल्या वर्षी आश्रयासाठी १,१२,००० अर्ज आल्याचं वृत्त ‘द गार्डियन’नं दिलं आहे.
टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय