नशीब म्हणतात! लॉकडाऊनमध्ये घर सफाईवेळी जॅक'पॉट' लागला; किंमत ऐकूनच भिरभिरला By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 3:42 PM
1 / 10 कोरोनामुळे काही महिन्यांपूर्वी जगभरात लॉकडाऊन झाले होते. यामुळे लोकांनी नोकरी-धंद्यात व्यस्त असताना जे केले नाही ते या काळात केले. जसे की घराची साफसफाई. घरातील लहान मोठे सारेच त्यांच्या त्यांच्या परीने या कामात गुंग झाले होते. 2 / 10 अशातच ब्रिटनमधून एक आश्चर्याचा धक्का देणारी बातमी आली आहे. घराची साफसफाई करताना एका व्यक्तीला अनेक वर्षे जुना टी पॉट सापडला होता. याची किंमत जेव्हा त्याने विचारली तेव्हा तो देखील भिरभिरला होता. 3 / 10 या व्यक्तीचे वय 51 वर्षे आहे. त्याचे नाव समोर आले नाही. मात्र तो लवकरच निवृत्त होणार आहे. या टी पॉटमुळे त्याची निवृत्तीनंतरची बेगमी झाली आहे. 4 / 10 महत्वाचे म्हणजे या व्यक्तीला त्याच्या घरात एवढी किंमती वस्तू आहे हे माहितीही नव्हते. लॉकडाऊनमध्ये काही काम नसल्याने त्याने घराची साफसफाई सुरु केली होती. 5 / 10 यावेळी त्याला पोटमाळ्यावर चहा ओतण्याचे भांडे (Tea Pot) मिळाले. हे कित्येक वर्षे धूळ खात पडले होते. धक्कादायक बाब म्हणजे हा टीपॉट तो व्यक्ती कोणालातरी असेच देण्याचा विचार करत होता. 6 / 10 लॉकडाऊन उठल्यानंतर त्यांनी ते भांडे एका लिलाव करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तीकडे नेले. त्याने या भांड्याची तपासणी केली. यावेळी हा टी पॉट दुर्मिळ शाही बिजिंग एनामेल्ड वाईन वेर असल्याचे समोर आले. 7 / 10 हा टी पॉट 1735 आणि 1799 च्या काळात चहा कपामध्ये ओतण्यासाठी वापरली जात होती. याची आताची किंमत 1 लाख युरो असल्याचे सांगण्यात आले. भारतीय रुपयांनुसार ही किंमत 86 लाख रुपये आहे. 8 / 10 ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांनी जेव्हा या व्यक्तीशी संपर्क साधला तेव्हा त्या व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर खुलासा केला आहे. ''मी जेव्हा तो टी पॉट घेऊन चार्ल्स हैन्सन (लिलाव तज्ज्ञ) यांच्याकडे गेलो तेव्हा तेथे उपस्थित असलेले लोक माझ्यावर हसतील असे वाटले होते.'' 9 / 10 तर चार्ल्स यांनी सांगितले की, सम्राट कियानलॉन्गच्या शासनकाळातील टी पॉट खूप फॅशनेबल असायचे. आता या टी पॉटचा लिलाव 24 सप्टेंबरला होणार आहे. या लिलावात याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. 10 / 10 अशाप्रकारे जर घराची साफसफाई करायला घेतली असेल तर तुम्हालाही वाडवडिलांनी ठेवलेली एखादी जुनी वस्तू सापडल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित तुमचेही नशीब बदलू शकते. आणखी वाचा