शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 3:29 PM

1 / 10
ओमानच्या खाडीमध्ये युद्धाभ्यास सुरु असताना इरानने चुकून आपल्याच युद्धनौकेवर मिसाईल डागली. यामध्ये १९ नौसैनिकांचा मृत्यू झाला असून अन्य काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
2 / 10
इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलने या दुर्घटनेची पुष्टी केली आहे. ही घटना रविवारी तेहरानच्या दक्षिण पूर्वमध्ये जस्क बंदराजवळ घडली.
3 / 10
ज्या युद्धनौकेवर हे मिसाईल डागले गेले ती युद्धनौका हेंडिजन क्लासची कोनारक होती. मिसाईल फुटल्याने ही नौका उद्ध्वस्त झाली आहे.
4 / 10
इराणच्या मिडीयाने मिसाईलच्या लक्ष्यापासून खूप जवळ असल्याने युद्धनौका दुर्घटना ग्रस्त झाल्याचे म्हटले आहे.
5 / 10
अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावामुळे इराण सध्या ओमानच्या खाडीमध्ये ताबा मजबूत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नौसेना अभ्यास करत आहे. याच मोहिमेतून इराणने कोनारक युद्धनौकेला तैनात केले होते.
6 / 10
कोनारक ही नौका हॉलंडकडून १९८८ मध्ये खरेदी करण्यात आली होती. या नौकेला २०१८ मध्येच अद्ययावत करण्यात आले होते. या जहाजाची लांबी ४७ मीटर होती. यामध्ये २० नौसैनिक राहू शकत होते.
7 / 10
या युद्धनौकेचा वापर इराण आखातात गस्त घालण्यासाठी देखील करत होता.
8 / 10
या भागात अमेरिकेच्याही युद्धनौका तैनात आहेत. या भागात अमेरिकेची ५ वी फ्लीट तैनात करण्यात आली आहे.
9 / 10
जगातील २० टक्के समुद्री तेल हे होरमुजच्या खाडीतून नेले जाते. याच भागात इराण आपली ताकद वाढविण्यासाठी नौसेनेचा सराव घेत आहे.
10 / 10
काही महिन्यांपूर्वी ब्रिटनच्या तेलवाहू जहाजांवर मिसाईल हल्ला झाला होता. हा हल्ला इराणनेच केल्याचा आरोप झाला होता.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाCrude Oilखनिज तेल