एका क्षणात उद्ध्वस्त झाल्या उंच इमारती, घरे आणि मंदिरे पडली; म्यानमार भूकंपाचे हादरवणारे फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:03 IST
1 / 8शुक्रवारी सकाळी ११.५० वाजता म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेसच्या मते, भूकंप १० किलोमीटर खोलीवर होता आणि त्याचे केंद्र मंडाले शहराजवळ होते. मंडाले शहरात बांधलेली मंदिरे आणि अनेक घरे उद्ध्वस्त झाली.2 / 8म्यानमारमधील ऐतिहासिक राजवाडा असलेल्या मांडले पॅलेसच्या काही भागांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी भूकंपात सागाइंग प्रदेशातील सागाइंग टाउनशिपमधील एक पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.3 / 8म्यानमारशिवाय बँकॉकमधील अनेक इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे. बांधकामाधीन काही इमारती क्षणार्धात भंगाराचे ढीग बनल्या.4 / 8म्यानमारमध्ये नदीवर बांधलेला ५० वर्षे जुना पूलही भूकंपात कोसळला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण पूल कचऱ्याचा ढीग बनला होता. पुलाच्या ढिगाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.5 / 8म्यानमारमध्ये एक तीन मजली घर कोसळल्याचेही समोर आलं आहे. भूकंपानंतर लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत.6 / 8भूकंपामुळे रस्तेही खचले आहे. भूकंपानंतर रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने वाहतूक खोळंबली आहे. लोकही रस्त्यांवर चालण्यास घाबरत आहेत.7 / 8थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये १.७ कोटी लोक हे उंच इमारतींमध्ये राहतात. त्यामुळे तेथे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.8 / 8थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये १.७ कोटी लोक हे उंच इमारतींमध्ये राहतात. त्यामुळे तेथे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.