शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बुटक्यांचं साम्राज्य, रिकामा मॉल अन् बरंच काही; जाणून घ्या चीननं जगापासून लपवलेल्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 4:19 PM

1 / 15
भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये आज पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर येत आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग तलाव परिसरात चिनी सैनिकांनी २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये काही गोष्टींबद्दल सहमती झाली होती. त्यांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्यानं दिली आहे.
2 / 15
चीनने याआधी देखील अनेकवेळा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. चीन एक जगातील सर्वात शक्तीशाली देश म्हणून ओळखला जातो. तसेच चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. चीनमधील १४ राज्यांच्या सीमा येसो चीन, पूर्व चीन आणि दक्षिण चीनी समुद्राच्या तटांपर्यत पसरलेल्या आहेत. चीन म्हणजे सतत विकास करणारा, आधुनिक असणार प्रगत देश अशीच त्याची सर्वत्र ओळख आहे. चीनने ज्या गतीने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे चीन सतत कौतुकाचा विषय ठरत आला आहे. पण चीनमध्ये अशाही काही गोष्टी आहेत, ज्या तिथे असतील अशी तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुम्हाला चीनचा खरा विद्रृप आणि विकृत चेहरा दाखवणाऱ्या गोष्टी माहिती आहे का? जर नसेल माहिती तर नक्की जाणून घ्या..
3 / 15
गरीबी- चीनमध्ये गरीबी मुख्य रुपात ग्रामीण भागात आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानूसार १०० दशलक्ष पेक्षा जास्त चीनी लोक निरक्षित आहेत. हे लोक प्रतिदिन १ डॉलरपेक्षा कमी पगारात जीवन जगत आहेत.
4 / 15
मृत्यू दंडाची शिक्षा- चीन कठोर शिक्षा देण्यासाठी ओळखला जातो. जेव्हा चीनमध्ये एखाद्याला मृत्यू दंडाची शिक्षा दिली जाते, तेव्हा त्याला एका विषारी इंजेक्शन दिले जाते किंवा त्याला गोळ्या घालून मारले जाते. या शिक्षेचा उल्लेख चीनच्या गुन्हेगार प्रकियात्मक कायद्याच्या कलम २५२मध्ये केला आहे.
5 / 15
वायू प्रदूषण- चीनमध्ये झपाट्याने होणारे औद्योगीकरण आणि खराब शहर नियोजनामुळे वायू प्रदूषणाचा स्तर खूप जास्त आहे. शिवाय जेटस्ट्रीम हे प्रदूषण अधिक पसरवते.
6 / 15
जगातील सर्वात रिकमा मॉल- चीन नेहमीच नवीन उत्पादनाला आणि श्रमबळाला पाठिंबा देतो. परंतु चीनमध चीनमध्ये एक असा मॉल देखील आहे, ज्याच्या प्रवेशद्वारवरील एक दोन खाण्यापिण्याचे काउंटर सोडले तर संपूर्ण मॉल रिकामा आहे. रिकामा मॉल देशात असणं म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला डाग असल्याचे चीनला वाटते. त्यामुळे असा रिकामा मॉल देशात असल्याचा गोष्टीचे चीनने वेळोवेळी खंडन केले आहे.
7 / 15
गुहेत राहणारे लोक- चीनच्या शानक्सी प्रांतातील लोक गुहा खोदून आदिमानवाप्रमाणे राहतात, असे काही वर्षापूर्वी समोर आले होते. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानूसार चीनमध्ये गुहेत राहणाऱ्या लोकांची संख्या जवळपास ३५ मिलियन आहे.
8 / 15
रेनकार्नेशनचे निर्बंध- हा निर्णय धार्मिक नाहीतर राजनैतिक होता. चीनी सरकारने लोकांवरील दलाई लामांचा प्रभाव कमी करण्यासाठी बौद्ध भिक्षूंच्या पुर्नजन्मावर प्रतिबंध लावला आहे.
9 / 15
वेबसाईटवर प्रतिबंध- अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चीनमध्ये प्रतिबंध आहे. येथे जवळपास ३००० संकेतस्थळावर इंटरनेट सेंसरशीप धोरणानूसार बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने मान्य केलेल्या संकेतस्थळांचा वापर करा, अशी सूचना चीन सरकारने दिल्या आहे. चीनमध्ये २००९पासून फेसबुक आणि ट्विटरवर बंदी आहे.
10 / 15
जल प्रदूषण- चीन लोक अपूऱ्या पाणीसाठ्याने आणि सांडपाण्याच्या समस्येने त्रासले आहे. एकूण लोकसंख्येच्या अर्ध्या अधिक लोकसंख्येला दूषित पाणी प्यावे लागते, हे सत्य आहे. चीनमध्ये तयार होणाऱ्या सांडपाण्यांपैकी फक्त १० टक्के पाण्यावर प्रक्रि होऊन त्याचा पुर्नवापर होतो.
11 / 15
ख्रिश्चन धर्म- चीनमध्ये ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या खूप जलद गतीने वाढत आहे. इथे इटलीमध्ये राहतात त्यापेक्षा जास्त ख्रिश्चन धर्माचे लोक राहत आहे. एका अहवालानूसार सध्या चीनमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त चर्चा आहे.
12 / 15
जन्म दोष- प्रदूषित पर्यावरण आणि असुक्षित खाद्यपदार्थांच्या वाढीमुळे चीनमध्ये इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त जन्मदोष आढळून येतात. चीनमध्ये १.२ मिलियन बालके जन्मत: दोषी आहे. २००१ पासून जन्मत: दोष असणाऱ्या बाळांचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढली आहे. आरोग्यबाबतची ही निरास्था चीनने जगासमोर येऊ दिलेली नाही.
13 / 15
गोबी वाळवंटाचा वाढता विस्तार- एकीकडे संपूर्ण जग पर्यावरण असंतुलन रोखण्यासाठी काम करत आहे, तर दूसरीकडे चीनमध्ये मात्र गोबी वाळवंटाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत चालला आहे. त्याबाबत चीन सरकार काहीही करु शकत नाही. पाण्याच्या स्त्रोतांची कमी असल्यामुळे आणि खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड झाल्यामुळे गे गोबी वाळवंट वाढत चालली आहे.
14 / 15
घोस्ट टाऊन- (भूतांचे शहर)- चीनमध्ये ६५ मिलियनपेक्षा जास्त घरे खाली आहेत, परंतु ही घरे एवढी महाग आहेत की चीनी लोक त्यांना खरेदी करु शकत नाही.
15 / 15
बुटक्या लोकांचे थीम पार्क- चीनमध्ये पर्यटन वाढविण्यासाठी फुलपाखरांसाठी वर्ल्ड इको गार्डन आणि ड्वार्फ एम्पायर (बुटक्या लोकांचे साम्राज्य) निर्माण केले आहे.
टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय