Singapore airlines boeing 787-10 dreamliner
स्वप्नवत... हवेतील 'फाइव्ह स्टार' हॉटेल पाहिलंत का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 3:08 PM1 / 8सिंगापूर एअरलाईन्सच्या (SIA) ताफ्यात जगातील पहिले बोईंग 787-10 दाखल झाले.2 / 8नॉर्थ चार्लस्टन, साऊथ कॅरोलिना येथील कारखान्यात याची निर्मिती करण्यात आली.3 / 8आपल्या ताफ्यात बोईंगची नविनतम विमाने दाखल करून घेणारी एसआयए ही जगातील पहिली हवाई सेवा आहे. पुढील महिन्यापासून व्यावसायिक सेवा देण्यासाठी ती सज्ज झाली आहे.4 / 8787-10 मध्ये एसआयएच्या नव्या रिजनल केबिन उत्पादनांचा समावेश असेल. यामध्ये 2 वर्गाच्या श्रेणीत मिळून एकूण 337 सीट्स आहेत. यामधील बिझनेस क्लासची 36 सीट्स आणि इकोनॉमी क्लासची 301 सीट्स आहेत.5 / 8वजनाला हलक्या असणाऱ्या संमिश्र साहित्याचा वापर करून तयार करण्यात आलेले 68 मीटर लांबीचे 787-10 हे बोईंगच्या ड्रीमलायनर विमान श्रेणीतील सर्वात जास्त लांबीचे विमान आहे. याची कार्यक्षमता ही अद्वितीय असून यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.6 / 8या विमानामध्ये आपल्याला हव्या त्या पद्धतीने प्रकाश योजना करण्याची सुविधा विमान प्रवाशांना मिळेल.7 / 8इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रकाश कमी-जास्त करता येऊ शकणाऱ्या मोठ्या खिडक्या, स्वच्छ हवा आणि शांत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव प्रवासी घेऊ शकतील. 8 / 8नॉर्थ चार्लस्टन, साऊथ कॅरोलिना येथील कारखान्यात याची निर्मिती करण्यात आली. आणखी वाचा Subscribe to Notifications