शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 3:30 PM

1 / 10
तुम्ही विमानातील टर्बुलेंसबाबत ऐकलं असेल परंतु जर कुठली फ्लाईट टर्बुलेंसमध्ये अडकली आणि ती ५ मिनिटांत ६ हजार फूट खाली आली तर ती परिस्थिती कशी असेल? अशाच परिस्थितीतून विमान प्रवासी गेलेत, ज्यांच्या डोळ्यासमोर साक्षात काही मिनिटांसाठी मृत्यू उभा राहिला.
2 / 10
टर्बुलेंस असा भयानक होता, ज्यामुळे विमानातील प्रवासी गोंधळात पडले, आजूबाजूला आदळले, कुठल्याही क्षणी प्लेन क्रॅश होईल असं वाटलं. २०० पेक्षा जास्त प्रवासी असलेलं हे विमान अखेर सुखरुप लँडिंग करण्यात आलं. परंतु यातील प्रत्येक प्रवाशी मृत्यूला हुलकावणी देऊन सुखरुप आले होते.
3 / 10
लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टहून सिंगापूर एअरलाइन्सची फ्लाईट १८ क्रू मेंबर्ससह प्रवाशांना घेऊन उड्डाण घेते. प्रवास सुरू असतो. जवळपास ११ तास या अलिशान फ्लाइटची मज्जा घेत हे विमान त्याच्या गंतव्य ठिकाणी पोहचणार होतं. संध्याकाळची वेळ होती. विमानात एअरहोस्टेस प्रवाशांना नास्ता देत होते. फ्लाईट म्यानमारच्या आकाशात होते.
4 / 10
परंतु अचानक फ्लाईटचा कॅप्टन प्रवाशांना टर्बुलेंसबाबत माहिती देतो. प्रत्येकाला आपापल्या जागेवर शांततेत बेल्ट घालून बसण्याचा सल्ला देतो. प्रवाशांची मदत करून क्रू मेंबर्सही आपापल्या जागेवर जातात, तितक्यात विमानाला धक्के बसतात. त्यामुळे प्रवासी एकमेकांवर आदळतात. विमानावरील कॅप्टनचं नियंत्रण सुटलं असं वाटायला लागतं.
5 / 10
परंतु ही फक्त सुरुवात होती. पुढील काही मिनिटांत असं काही होतं ज्याची कल्पनाही कुणी केली नसावी. अचानक विमान वेगाने खाली येत असतं. या भयानक स्थितीत सीटबेल्ट घातलेले प्रवासी फ्लाईटच्या आतमध्ये उलटे होतात, विमानाचं छताला प्रवासी आदळतात. ऑक्सिजन मास्क निघून लटकू लागते. प्रत्येक प्रवासी सीटवर आपटतो. इतक्या जोरात आदळल्याने प्रत्येकाला काही ना काही दुखापत होते.
6 / 10
कुणी फ्लाईटच्या भिंतीला तर कुणी सीट हँडलला टक्कर देते. काही मिनिटांमध्ये घडलेला या प्रकाराने सगळेच भयभीत होता. हा आपल्या आयुष्यातील शेवटचा प्रवास अशी भीती प्रवाशांना वाटू लागते. घडलेल्या प्रकारामुळे अंगाचा थरकाप उडतो. फ्लाईट जसजसी खाली वेगाने जात होती तसं आपल्या आयुष्यातील हे शेवटचे क्षण असल्याची जाणीव प्रवाशी आणि क्रू मेंबर्सला होते. कारण एअर टर्बुलेंसमध्ये अडकून हे विमान आता क्रॅश होणार होते. जर हे घडलं असतं तर कुणीही जिवंत राहण्याची अपेक्षा नव्हती.
7 / 10
संपूर्ण विमानात कल्लोळ माजला होता. अनेकजण भीतीने रडू लागले होते, काहीजण प्रार्थना करत होते सर्वकाही एकाचवेळी सुरू होतं. काही प्रवाशी शांतपणे आता आपलं मरण जवळ आलंय हे मनाला समजावून शांतपणे त्या क्षणाची वाट पाहत होते.
8 / 10
अवघ्या ५ मिनिटांत हे विमान किमान ६ हजार फूट खाली आलं. जेव्हा हे विमान टर्बुलेंसमध्ये अडकलं तेव्हा ते जमिनीपासून ३७ हजार फूट उंचीवर होतं. परंतु ६ मिनिटांत ते ३१ हजार फूटांवर आलं त्यामुळे मृत्यू नेमका काय असतो हे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर काही मिनिटांसाठी दिसला.
9 / 10
परंतु नशीब बलवत्तर आणि पायलटनं राखलेले प्रसंगावधान यातून फ्लाईट टर्बुलेंसमधून बाहेर आली. पुन्हा सर्वसामान्य उड्डाण सुरू झालं. फ्लाइटमधील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर ही फ्लाईट सिंगापूरच्या झांगी एअरपोर्टऐवजी थायलँडच्या बँकॉक एअरपोर्टवर इमरजेन्सी लँडिंग करण्यात आलं.
10 / 10
या घटनेमुळे अनेक प्रवाशांना गंभीर जखमा झाल्या होत्या, काही प्रवाशांची तब्येत बिघडली होती. फ्लाईटला जबर नुकसान झालं होतं त्यामुळे अशा विमानानं उड्डाण पुढे चालू ठेवणे धोकादायक होतं त्यामुळे पायलटनं या विमानाचं लंडिंग करण्याचा निर्णय घेतला होता. तोवर बँकॉक एअरपोर्टवरही सर्व तयारी करून ठेवली होती. जखमी प्रवाशांना तात्काळ उपचार देण्यात आले.
टॅग्स :airplaneविमानsingaporeसिंगापूर