शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठा दावा! पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अणुबॉम्ब; दोन्ही देश जगापासून 'काहीतरी' लपवतायत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:37 PM

1 / 12
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूट (SIPRI) ने जगभरात सोमवारी खळबळ उडविणारा अहवाल सादर केला आहे. ही संस्था जगभरातील देशांकडील शस्त्रास्त्रे, देशांमधील शांततापूर्ण संबंध आदी गोष्टींवर लक्ष ठेवते. यामध्ये सर्वाधिक खळबळ उडविणारा दावा म्हणजे पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अणुबॉम्ब आहेत.
2 / 12
सिप्रीने गेल्या वर्षीचा हवाला दिला आहे. पाकिस्तानकडे १६५ तर भारताकडे १६० अण्वस्त्रे आहेत. परंतू जर ते वापरायची वेळ आली तर भारत पाकिस्तानवर भारी पडेल, असे या अहवालात म्हटले आहे. कारण भारताकडे पाकपेक्षा चांगल्या शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची सुविधा आणि लाँचिंग पॅड्स आहेत.
3 / 12
पाकिस्तानकडे कमी पल्ल्याची मिसाईल नस्त्र, हत्फ, गजनवी आणि अब्दाली आहे. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता ६० ते ३२० किमी आहे. मध्यम पल्ल्याच्या गौरी आणि शाहीन ची मारक क्षमता ९०० ते २७०० किमी आहे. या दोन्ही मिसाईलने भारतावर हल्ला झाला तर दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, पुणे, भोपाळ, नागपूर, लखनऊपर्यंत टप्प्यात येते.
4 / 12
आता विध्वंस किती होईल हे त्या मिसाईवर लावलेल्या शस्त्रांवर अवलंबून आहे. पारंपरिक शस्त्रे लादली तर विध्वंस कमी होईल, परंतू अण्वस्त्रे लादली तर मोठे नुकसान होईल, असे सिप्रीने म्हटले आहे.
5 / 12
भारताकडे अशा प्रकरची ९ मिसाईल आहेत. ही मिसाईल जमीन, हवा आणि पाण्यातून लाँच केली जाऊ शकतात. काही मिसाईलमध्ये तर अशी शक्ती आहे जी तिन्ही स्तरांवरून डागता येतात. पाकिस्तानपेक्षा या मिसाईलचा वेग, रेंज आणि शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता जास्त आहे.
6 / 12
पृथ्वी मिसाइलचे तिन्ही व्हेरिअंट आहेत. याची रेंज १५० किमी आहे. पृथ्वी-2 ही 250-350 KM पर्यंत मारा करेल. पृथ्वी-3 350-750 KM रेंज आहे. तिन्ही मिसाईल आपल्यासोबत ५०० ते १००० किलो वजनाची अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतात.
7 / 12
धनुष मिसाईल तर नौदलाची सर्वात मोठी ताकद आहे. हे मिसाईल युद्धनौकेवरून हवेत, जमिनीवर किंवा शत्रूच्या युद्धनौकेवर डागता येते. अग्नि मिसाइल तर या साऱ्यांचा बाप आहे. याचे सहा व्हेरिअंट आहेत, आणि सातवा प्रकार तयार होतोय. अग्नि-5 इंटरकॉन्टिनेंटल बैलिस्टिक मिसाइल आहे व रेंज 5500 KM आहे. अग्नि ६ तयार होतेय, याची रेंज तर 12 ते 16 हजार KM असेल.
8 / 12
शौर्य मिसाइलचा वेग पाकिस्तानींचे धाबे दणाणून सोडणारा आहे. 9,190 KM प्रति तास. मीडियम रेंज बैलिस्टिक मिसाइल असले तरी अण्वस्त्रे घेऊन आकाशात ५० किमी उंचीवर उडू शकते. तसेच १९०० किमीपर्यंत मारा करू शकते. 1000 KG ची अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते.
9 / 12
भारताच्या भात्यात एवढीच मिसाईल नाहीत, तर अण्वस्त्रवाहू पाणबुडीवरून डागता येणारी के-मिसाइल/सागरिका रेंज 750 किमी आणि वेग 9260 KM प्रति तास हे देखील आहे. ब्रह्मोस मिसाइल तर सर्वांनाची माहिती आहे. 3704 KM वेग आणि 600 KM रेंज.
10 / 12
निर्भय मिसाइल हे तर कोणत्याही वातावरणात वापरता येणारे, सबसोनिक क्रूज मिसाइल आहे. आपल्यासोबत 300 KG अण्व्स्त्रे घेऊन 1500 KM पर्यंत मारा करू शकणारे हे मिसाईल आहे.
11 / 12
पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करू शकणारे सूर्य मिसाईल सध्या रांगेत आहे. अचूक माहिती नाहीय परंतू हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे जे 33,100 KM प्रति तासाच्या वेगाने 16 हजार KM पर्यंत मारा करू शकते. या मिसाईलच्या निर्मितीचे काम सुरु आहे. हे सारे पाहता सिरीचा भारतच शक्तीशाली असल्याचा दावा योग्य ठरतो.
12 / 12
सिरीच्या आकडेवारीनुसार जगातील ९ देश अण्वस्त्र संपन्न आहेत. यामध्ये अमेरिका - 5428, रशिया - 5977, चीन - 350, फ्रांस - 290, यूके - 225, इस्त्रायल - 90 आणि उत्तर कोरियाकडे २० अण्वस्त्रे आहेत. भारत आणि पाकिस्तान दोन्हीही मिसाईल चाचण्या घेत आहेत, अण्वस्त्र शक्ती वाढवत आहेत, परंतू नेमकी माहिती देत नसल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत