शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही डेंजर आहे बहीण क‍िम यो जोंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 12:19 PM

1 / 12
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे. यामुळे चीनने काल किमला वाचविण्यासाठी डॉक्टरांची टीमच कोरियाला पाठविली होती.
2 / 12
आज दिवसभरात सोशल मिडीयावर किम जोंग उन यांचा मृत्यू किंवा ब्रेन डेड याबाबत मोठी चर्चा झडत होती. याबाबत उद्या मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
3 / 12
याचवेळी किम जोंग उनचा उत्तराधिकारी घोषित केला जाईल. उनची मुले लहान असल्याने त्याची बहीण क‍िम यो जोंगला ही खूर्ची मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास जगाला पहिलीच महिला हुकुमशहा मिळणार आहे.
4 / 12
सोशल मिडीयावर क‍िम यो जोंगच्या नावाची चर्चा आहे. काही लोक तिला 'क्यूट' म्हणत आहेत, काहींना ती किम जोंग उनपेक्षाही डेंजर वाटत आहे. याची चुनुक तिनेच काही प्रसंगांवेळी दिली आहे.
5 / 12
जागतिक तज्ज्ञांनी किम यो जोंग ही खूप कठोर आणि डेंजर असल्याचा इशारा दिला आहे. जोंग याच्या अनेक निर्णयांमध्ये आणि धोरणे ठरविण्यामध्ये तिचा महत्वाचा सहभाग असायचा.
6 / 12
पक्षाच्या लोकांना ती जोंग यांच्याशी सन्मानाने आणि घाबरून सामोरे जाण्यासाठी सांगायची. धक्कादायक म्हणजे कोणतेही पद नसताना उत्तर कोरियाची प्रसारमाध्यमे नेहमी तिच्या नावाचा उल्लेख करायचे.
7 / 12
ऑर्गनाइजेशन ऐंड गाइडेंस डिपार्टमेंटमध्ये जांगने तिचा वेगळा ठसा आणि ताकद वाढविली होती. यामुळे कामगार पक्षाच्या नेत्यांच्या मनात तिचे स्थान उत्तर कोरियाची दुसऱ्या क्रमांकाची ताकद असे बनले.
8 / 12
ही एक रणनीती होती. किम जोंग उन यांना काही झाल्यास त्यांची जागा घेण्यासाठी जांग यांना मुद्दामहून तयार करण्यात आले होते. तसे शिक्षण आणि रणनीती शिकविण्यात आली होती.
9 / 12
किम यो जोंग नेहमीच तिचा भाऊ उन याच्या पाठीशी राहिली. तिने पुढे येऊन कधीच वादाचा प्रसंग उभा केला नाही. यामुळे तिची प्रतिमा बनत गेली. तिने अनेक मुद्द्यांवर तिची मते मांडली होती.
10 / 12
तिची हुशारी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या पहिल्याच भेटीवेळी दिसून आली होती. या भेटीत उनच्या जिवाला काहीही धोका उत्पन्न होण्याची शक्यता होती. अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी किम त्रयस्थ ठिकाणी गेले होते.
11 / 12
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची सुरक्षा किती असते याचा अनुभव जगाने घेतला आहे. तशा तणावातही किम यो जोंग हिने भावाला काही होऊ नये म्हणून नजर ठेवली होती.
12 / 12
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची सुरक्षा किती असते याचा अनुभव जगाने घेतला आहे. तशा तणावातही किम यो जोंग हिने भावाला काही होऊ नये म्हणून नजर ठेवली होती.
टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरियाDeathमृत्यू