शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...म्हणून त्यांनी हत्ती मारला, अख्ख्या गावाने वाटून खाल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 7:02 PM

1 / 5
पश्चिम आफ्रिकेमधील एका गावात हत्तीने मोठ्या प्रमाणात हैदोस घातला होता. या हत्तीच्या त्रासामुळे गावातील लोक एवढे वैतागले होते की त्यांनी थेट त्या हत्तीलाच ठार मारले. एवढेच नाही तर त्यांनी या हत्तीचे तुकडे करून त्याचे मांस अख्ख्या गावाने वाटून खाल्ले. मिळालेल्या माहितीनुसार हा हत्ती पश्चिम आफ्रिकेमधील बेनिनच्या नॅशनल वाईल्ड लाईफ पार्कमधून पळून गेला होता. तसेच नॅशनल पार्कमधून पळाल्यानंतर तो कांदी नावाच्या क्षेत्रात फिरत होता.
2 / 5
हा हत्ती मार्च महिन्यापासूनच या भागाच्या जवळच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वावरत होता. तसेच या हत्तीने सर्वप्रथम एका महिलेला लक्ष्य केलेल होते. त्यानंतर त्याने गावातील अनेक लोकांना जखमी केले होते. तेव्हापासून येथील स्थानिकांमध्ये या हत्तीबाबर खूप रोष होता.
3 / 5
अनेक लोकांनी या हत्तीला मारण्याची किंवा त्याला परत नॅशनल पार्कमध्ये हुसकावून लावण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र त्यांच्या बोलण्याकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. त्यानंतर एका महिन्याने सोनसोरो क्षेत्रातील अजून दोन लोकांचा या हत्तीने बळी घेतला. तेव्हापासून प्रशासन या हत्तीविरोधात आक्रमक झाले. तसेच दक्षिण आफ्रिकेतील एनजीओ आफ्रिकन पार्क रेंजर्सने या हत्तीचा शोध सुरू केला होता.
4 / 5
२७ एप्रिल रोजी रेंजर्सनी सांगितले की, हा हत्ती मारला गेला आहे. त्यानंतर रेंजर्सच्या कर्मचाऱ्यांनी या हत्तीची चिरफाड केली. तसेच त्याचे मांस स्थानिक लोकांमध्ये वाटून टाकले. त्यानंतर सोशल मीडियावर या लोकांचे फोटो व्हायरल होऊ लागले होते. रेंजर्सना इच्छा नसतानाही या हत्तीला मारावे लागले. कारण हा हत्ती स्थानिकांसाठी खूप धोकादायक बनला होता.
5 / 5
फ्रान्स २४ सोबत बोलताना फॉरेस्ट्री कॅप्टन डेव्हिड आयेगनन यांनी सांगितले की, हत्तीला अलीबोरी नदीजवळ मारले गेले. आम्हा रेंजर्सचे काम पर्यावरण वाचवण्याचे असते. मात्र आम्ही स्थानिक लोकांच्या खूप दबावाखाली होतो. आम्हाला प्राणी मारायला आवडत नाही. मात्र हा हत्ती एवढा हिंसक झाला होता की त्याला नॅशनल पार्कमध्या माघारी पाठवणे कठीण बनले होते. तसेच त्याला माघारी नेण्यासाठी ट्रान्सपोर्टची सुविधाही उपलब्ध नव्हती.
टॅग्स :wildlifeवन्यजीवInternationalआंतरराष्ट्रीय