रहस्यमय पिरॅमिड! टाळी वाजवताच ऐकू येतो चिमण्यांचा चिवचिवाट, आजवर रहस्य उलगडेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 13:31 IST
1 / 8पृथ्वीवरील रहस्यमय ठिकाणांपैकी मेक्सिकोमधील एका पिरॅमिडची जगात चर्चा आहे. 'चिचेन इट्जा चिर्प' असं या पिरॅमिडचं नाव असून इजिप्तमधील पिरॅमिडपेक्षा हे पिरॅमिड अतिशय वेगळं आहे. 2 / 8चिचेन इट्जा खरंतर एक कोलंबियाई मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या खाली उभं राहून एखाद्यानं टाळी वाजवली तर त्याचा प्रतिध्वनी तयार तर होतोच पण त्या ध्वनीचं परिवर्तन चिमण्यांच्या चिवचिवाटामध्ये होतं. 3 / 8अनेकांना यावर विश्वास बसत नाही. पण प्रत्यक्षात या पिरॅमिडला भेट दिल्यानंतर आणि स्वत: अनुभव घेतल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावतात. पिरॅमिडच्या खाली टाळी वाजवली की पिरॅमिडच्या घुमटामुळे प्रतिध्वनी तयार होतो. पण हा प्रतिध्वनी चिमण्यांच्या चिवचिवाटासारखा निर्माण होतो. 4 / 8ध्वनी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पिरॅमिडमध्ये टाळी वाजवल्यास तयार होणारा प्रतिध्वनी क्विजटल नावाच्या पक्ष्याच्या आवाजासारखा ऐकू येतो. इतकंच नव्हे, तर काही जणांनी एकत्रितरित्या टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली तर निर्माण होणारा प्रतिध्वनी चिमण्यांच्या थव्याचा चिवचिवाट सुरू असल्यासारखा ऐकू येतो. 5 / 8१९९८ साली कॅलिफोर्नियाचे ध्वनी तज्ज्ञ डेव्हिड लुबमॅन यांनी चिचेन इट्जा पिरॅमिडमध्ये या अजब प्रतिध्वनीचा शोध लावला. त्यानंतर अनेक ध्वनी तज्ज्ञ अभ्यासासाठी येथे आले. अनेकांनी यावर संशोधन केलं पण आजवर एकाही तज्ज्ञाला टाळी वाजवल्याचा प्रतिध्वनी चिमण्यांच्या आवाजासारखा का निर्माण होतो यामागचं कारण शोधता आलेलं नाही. 6 / 8चिचेन इट्जाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पिरॅमिडमध्ये ड्रम्स वाजवले किंवा किंचाळलं तर प्रत्येकवेळी वेगवेगळा प्रतिध्वनी ऐकू येतो. त्यामुळे या पिरॅमिडच्या रहस्यमय गोष्टींचा आजवर उलगडा होऊ शकलेला नाही. पिरॅमिड उभारणाऱ्यांना या गोष्टीची म्हणजेच निर्माण होणाऱ्या प्रतिध्वनींची कल्पना होती का? हे सांगणं देखील कठीण आहे. 7 / 8पिरॅमिडच्या एका बाजूच्या पायऱ्यांवर सुर्यप्रकाश पडतो तेव्हा त्यातून एका सापाच्या आकाराचं प्रतिबिंब तयार होतं असंही दिसून आलं आहे. बेल्जियम युनव्हर्सिटीचे वैज्ञानिक मिको डिक्लर्क यांनीही या पिरॅमिडचा अभ्यास केला आणि आणखी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. 8 / 8 मिको डिक्लर्क यांनी सांगितलं की, पिरॅमिडच्या पायऱ्यांवरुन चढताना येणारा आवाज हा एखाद्या बादलीमध्ये पावसाचं पाणी पडतंय असा प्रतित होतो. विशेष म्हणजे, या पिरॅमिडची निर्मिती करणारे लोक पावसाला देव मानत होते. त्यामुळे हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही.