अफगाणिस्तानमधून गायब झाला २ हजार वर्ष जुना सोन्याचा खजिना, खाणं-पिणं सोडून शोधताहेत तालिबानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 14:46 IST
1 / 5अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानसाठी देश चालवणं काही सोपं काम नसणार आहे. अशात येथील एका २ हजार वर्ष जुन्या खजिन्याबाबत चर्चा होत आहे. हा खजिना तालिबान शोधत आहे. हा प्राचीन बॅक्ट्रियन खजिना आहे. ज्यात सोन्याच्या वस्तू आहेत. चार दशकांपूर्वी हा खजिना अफगाणिस्तानातील टेला टापा भागात शोधण्यात आला होता. 2 / 5कल्चरल कमिशनचे डेप्युटी हेड अहमदुल्लाह वासिक यांनी टोलो न्यूजला सांगितलं की, 'त्यांनी हा खजिना शोधण्यासाठी संबंधित विभागाकडे काम सोपवलं होतं. आता हा चौकशीचा विषय आहे की, बॅक्ट्रियन खजिना अफगाणिस्तानात आहे की तो बाहेर नेण्यात आलाय. जर असं असेल तर हा राजद्रोह असेल. तालिबान यावर गंभीर कारवाई करेल.3 / 5नॅशनल जिओग्राफीनुसार बॅक्ट्रियन खजिन्यात प्राचीन सोन्याचे हजारो तुकडे असतात आणि हे सोनं प्राचीन कबरींमध्ये आढळून आलं आहे. केवळ सहा कबरींमधून हे सोनं काढण्यात आलं. या कबरींमध्ये २० हजारांपेक्षा जास्त वस्तू होत्या. ज्यात सोन्याच्या अंगठी, नाणी, हत्यार, कानातले, बांगड्या आणि मुकुट यांचा समावेश आहे. सोन्यासोबतच यात अनेक किंमीत रत्नेही सापडली.4 / 5एक्सपर्टचं मत आहे की, कबरीं सहा श्रीमंत आशियाई व्यक्तींच्या होत्या. ज्यात पाच महिला आणि एका पुरूषांचा समावेश आहे. नॅशनल जिओग्राफीने २०१६ मध्ये सांगितलं होतं की, सोन्यासोबत मिळालेल्या २ हजार वर्ष जुन्या कलाकृती तेव्हाचं लाइफस्टाईल सांगतात. मोठ्या प्रमाणात किंमती वस्तू सापडल्या. त्यातील सोन्याच्या मुकुटाने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. बॅक्ट्रियन खजिना अफगाणिस्तानाचा नॅशनल हेरिटेज आहे. 5 / 5वासिक म्हणाले की प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संरक्षणावर आंतरराष्ट्रीय समुदायासोबत जो करार केला आहे तो तसाच राहणार आहे. टोलो न्यूजनुसार, वासिक म्हणाले की, त्यांच्या आकलनानुसार, राष्ट्रीय संग्रहालये, राष्ट्रीय संग्रह आणि राष्ट्रीय गॅलरी, ऐतिहासिक - प्राचीन स्मारकं आपल्या ठिकाणी सुरक्षित आहेत.