शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' देशात पसरत आहे 'वीर्य दहशतवाद', महिलांना 'असं' केलं जातंय टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 2:44 PM

1 / 7
दक्षिण कोरियात काही नेते सध्याच्या कायद्यांमध्ये संशोधन करण्याची मागणी करत आहेत. या नेत्यांची मागणी आहे की, कायद्यात संशोधन करत सीमेन टेररिज्म (Semen Terrorism) म्हणजे वीर्य दहशतवादाला एक गंभीर सेक्स क्राइम मानलं जावं. गेल्या काही वर्षात दक्षिण कोरियात अशा काही घटना समोर आल्या आहेत ज्यात महिलांचा अपमान करण्यासाठी किंवा त्यांना त्रास देण्यासाठी पुरूषांनी सीमेनचा म्हणजेच वीर्याचा वापर केला.
2 / 7
२०१९ मध्ये एका व्यक्तीने एका महिलेच्या शूजवर सीमेन टाकून ते खराब करण्याचा प्रयत्न केला होता. कोर्टाने या व्यक्तीला ४३५ डॉलर्सचा दंड ठोठावला होता. याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं होतं की, या केसमध्ये प्रॉपर्टी डॅमेजचे चार्ज लावण्यात आले. कारण या केसमध्ये लैंगिक गुन्ह्याचे आरोप लागू करण्याचा काहीच नियम नव्हता.
3 / 7
त्याचप्रमाणे आणखी एका केसमध्ये एका व्यक्तीला तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. कारण त्याने एका महिलेच्या कॉफीमध्ये सेक्शुल इच्छा वाढवणारं औषध आणि सीमेन टाकलं होतं. या व्यक्तीला ती महिला आवडत होती. पण महिलेला तो आवडत नव्हता. त्यामुळे त्याने महिलेवर अशाप्रकारे सूड उगवला होता.
4 / 7
असं असूनही या केसला सेक्स क्राइम म्हणून पाहिलं गेलं नाही. कारण या केसमध्ये महिलेसोबत कोणतीही जबरदस्ती करण्यात आली नव्हती. तिला धडा शिकवण्यासाठी हे केलं गेलं होतं. या घटना समोर आल्यावर दक्षिण कोरियात अशा केसेना सीमेन टेररिज्म म्हटलं जाऊ लागलं.
5 / 7
त्यासोबतच मे २०२१ मध्ये एका सिव्हिल सर्व्हंट व्यक्तीने गेल्या सहा महिन्यात सहा वेळा त्याच्या सहकारी महिलेच्या कॉफीच्या ग्लासमध्ये सीमेन टाकलं होतं. कोर्टाने सांगितलं की, या व्यक्तीच्या कृत्यामुळे कॉफीचा कंटेनर खराब झाला. स्थानिक मीडियाने याव्यतिरिक्तही काही सीमेन टेररिज्मच्या घटना दाखवल्या.
6 / 7
डेमोक्रेटिक पार्टीचे Baek Hye ryun ने याबाबत बोलताना गार्डियन्स सांगितलं की, या केसमध्ये महिलेला अपमानित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तरीही हा सेक्स क्राइम मानला गेला नाही. कारण दोघांचाही डायरेक्ट काही फिजिकल कॉन्टॅक्ट झाला नाही. कोर्टाने कॉफी मग डॅमेज झाल्याबाबत चिंता व्यक्ती केली. ही त्यापेक्षा जास्त खतरनाक घटना आहे.
7 / 7
याप्रकरणी बोलताना कोरियन वीमेन लिंकच्या सेक्रेटरी जनरल Choi Won-jin म्हणाल्या की, प्रत्येक सेक्स क्राइम एक गंभीर गुन्हा असतो. या केसेसना हिंसेच्या सामान्य केस समजू नये. या गोष्टी मुद्दामहून एका खास जेंडरला टार्गेट करण्यासाठी केल्या जातात. त्यामुळेच हा केस सेक्स क्राइमच नाही तर हेट क्राइमच्या श्रेणीत टाकला पाहिजे.
टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाCrime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीय