southwest airlines captain sentenced for watching porn in front of female pilot
विमानात महिला पायलटसमोर कॅप्टनने पाहिला पॉर्न व्हिडिओ, सुनावली शिक्षा By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 6:16 PM1 / 9अमेरिकेत उड्डाण करणाऱ्या विमानात महिला पायलटसमोर पॉर्न व्हिडिओ पाहिल्याप्रकरणी आरोपी कॅप्टनला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. डेलीमेल या वेबसाइटनुसार, नोकरी सोडल्यानंतर कॅप्टनला आपल्या या कृत्याची किंमत मोजावी लागत आहे. कोर्टाने आरोपी कॅप्टनला एक वर्षाचा प्रोबेशन आणि 5 हजार डॉलर दंड ठोठावला आहे.2 / 9दरम्यान, हे प्रकरण 10 ऑगस्ट 2020 चे आहे, जेव्हा फिलाडेल्फियाहून ऑरलँडोकडे जाणाऱ्या साऊथवेस्ट एअरलाइन्सचे विमान उड्डाण करत होते. या विमानाचा कॅप्टन 60 वर्षीय मायकल हॉकने महिला पायलटसमोर अश्लील कृत्य केले. या कॅप्टनने विमानाच्या कॉकपिटमध्ये ठेवलेल्या लॅपटॉपवर पॉर्न व्हिडिओ पाहिला, असा आरोप केला जात आहे.3 / 9कोर्टात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कॅप्टन मायकल हॉक यांनी या कृत्याबद्दल माफी मागितली आणि खेद व्यक्त केला. मात्र अमेरिकेचे न्यायाधीश जे. मार्क कॉल्सन यांनी कॅप्टनला एक वर्षाची शिक्षा आणि पाच हजार डॉलर्स दंड ठोठावला.4 / 9या सुनावणीदरम्यान महिला पायलटसोबत सहमतीने हे सुरू केले, असे कॅप्टन म्हणाला. मात्र, फिर्यादीच्या वकिलाने सांगितले की, 10 ऑगस्ट 2020 ला ऑरलँडोला जाण्याऱ्या त्या उड्डाणापूर्वी मायकल हॉक कधीही महिला पायलटला भेटला नाही. मायकल हॉक पायलटच्या सीटवरुन खाली आला आणि त्याने आपले कपडे काढले, त्यानंतर त्याने लॅपटॉपवर पॉर्न व्हिडिओ पाहण्यास सुरूवात केली.5 / 9यादरम्यान, महिला पायलट आपले कर्तव्य बजावत उड्डाण करत राहिली, असे सांगण्यात आले. तर न्यायाधीशांनी मायकल हॉकला सांगितले की, त्याच्या कृतींचा सह-पायलटवर वेदनादायक परिणाम झाला आहे. यामुळे प्रवाशांच्या व अन्य सहका-यांच्या सुरक्षेवर परिणाम झाला असता.6 / 9दुसरीकडे, बचाव पक्षातील वकील मायकल सालनिक यांनी सांगितले की, व्यावसायिक पायलट म्हणून मायकल हॉकची चमकदार कारकीर्द होती. मायकल हॉकच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी त्याला साऊथवेस्ट एअरलाइन्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी केली यांच्यासह प्रवासी आणि सहकार्यांकडून असंख्य प्रशंसा आणि समर्थन पत्रे मिळाली होती.7 / 9मायकल हॉकच्या वकिलांनी सांगितले की, जेव्हा आरोपी आपली चूक कबूल करत असेल आणि त्याच्याकडून कोणताही सबब किंवा खोटेपणा सादर केला नाही. तर या सर्व गोष्टी लक्षात घेता मायकल हॉक हा शिथिल शिक्षेस पात्र आहे. बचाव पक्षाच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आपला निर्णय दिला.8 / 9साऊथवेस्ट एअरलाइन्सचे प्रवक्ते क्रिस मेंज म्हणाले की, फ्लोरिडाच्या लाँगवुड येथे राहणाऱ्या हॉकने 27 वर्षांपर्यंत साऊथवेस्ट एअरलाइन्सची सेवा केली. तर या प्रकरणात आरोपी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी 31 ऑगस्ट 2020 रोजी त्याने शेवटचे उड्डाण घेतले. विमान कंपनी अशा प्रकारचे वर्तन सहन करत नाही आणि अशा प्रकारच्या वर्तनाची पुष्टी झाल्यास त्वरित कार्यवाही करेल.9 / 9याचबरोबर, क्रिस मेंज म्हणाले की, जेव्हा मायकल हॉकने स्वेच्छेने एअरलाइन्स सोडली, तेव्हा त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतरही साऊथवेस्ट एअरलाइन्सने या प्रकरणाचा तपास केला आणि मायकल हॉकला एअरलाइन्सपासून विभक्त झाल्यानंतर मिळालेले फायदे देणे बंद केले. आणखी वाचा Subscribe to Notifications