Space Tourism: 8 Cool Destinations That Future Mars Tourists Could Explore on Planet
माऊंट एव्हरेस्टपेक्षाही तीन पटीनं उंच पर्वत अन् बरंच काही...; मंगळावरील ८ ठिकाणं होतील पर्यटनस्थळं By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 4:44 PM1 / 9मंगळावर जेव्हा मानवसृष्टी वसेल तेव्हा या लाल ग्रहावर पर्यटनासाठी अनेक ठिकाणं आहेत की जी पर्यटकांचं लक्ष वेधून घेतली आणि नवे विक्रम रचले जातील असा दावा केला जात आहे. 2 / 9मंगळ ग्रह मोठमोठ्या पर्वतरांगा, दरी आणि खड्ड्यांनी भरलेला ग्रह असल्याचं सांगितलं जातं. मंगळावर आढळलेली सर्वात मोठी दरी वेल्स मेरिनरिस नावं ओळखली जाते. या दरीची लांबी जबवळपास ३ हजार किमी इतकी आहे. 3 / 9मंगळ ग्रहावरील दोन ध्रूवांवर लोक पर्यटनासाठी जाऊ शकतात. २००८ साली फिनिक्स लँडरच्या माध्यमातून करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार या दोन्ही ध्रूवांवरील बर्फाच्छादीत भागाची रचना काहीशी वेगळी आहे. 4 / 9नासाच्या माहितीनुसार, थार्सिस मोंटेस नावाचा सर्वात मोठा ज्वालामुखी मंगळ ग्रहावर आहे. हा ज्वालामुखी जब्बल ४ हजार किमी लांब पसरला आहे आणि याची उंची १० किमी इतकी आहे. मंगळावर एकूण १२ मोठे ज्वालामुखी आहेत.5 / 9मंगळावर खाऱ्या पाण्याचं अस्तित्व होतं असा दावा देखील नासानं २०१५ साली केला होता. यात काही प्रवाहांची छायाचित्र जारी करण्यात आली होती6 / 9मंगळावर ऑलम्पस मॉन्स नावाचा सर्वात उंच पर्वत आहे. विशेष म्हणजे या पर्वताच्या शिखराची उंची माऊंट एव्हरेस्टपेक्षाही तीन पटीनं अधिक आहे. थारिस ज्वालामुखी क्षेत्रात हा पर्वत आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातूनच या पर्वताची निर्मिती झाल्याचं सांगण्यात येतं. हे देखील भविष्यात मोठं पर्यटन स्थळ होऊ शकतं असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. 7 / 9मंगळावर एक अशी जागा आहे की ज्याची सर्वाधिक चर्चा होती. ती म्हणझे मेडुसे फॉसे. एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसा याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती आढळून आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी एलियन्सचं अस्तित्व असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. 8 / 9२०१२ साली क्युरोसिटी रोव्हरनं केलेल्या संशोधनात मंगळावर पाण्याचं अस्तित्व होतं यासंदर्भातील अनेक पुरावे शोधून काढले होते. मंगळावर लँडींग केल्याच्या काही आठवड्यांमध्येच रोव्हरनं पाण्याचा शोध लावला होता. यात पाण्याच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे जमा करण्यात आले होते. क्युरोसिटी रोव्हर सध्या मंगळावर माऊंट शार्प नावाच्या एका ज्वालामुखीचा अभ्यास करत आहे.9 / 9मंगळावर भविष्यात मानवीवस्ती निर्माण झाली. तर जगातील नवंनवी आश्चर्य लाल ग्रहावर पाहायला मिळतील. एका वेगळ्याच जगाचे मानवसृष्टी साक्षीदार होईल असं वैज्ञानिक सांगतात. आणखी वाचा Subscribe to Notifications