As the speed of the earth's rotation increased, so did the effect
मोठ्या संकटाची चाहूल? पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग वाढला, होऊ शकतो असा परिणाम By बाळकृष्ण परब | Published: January 07, 2021 6:57 PM1 / 8आपले वास्तव्य असलेली पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीला स्वत:भोवती फिरण्यासाठी २४ तासांचा अवधी लागलो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र आता पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या वेगामध्ये मोठा बदल झाला असल्याची माहिती संशोधनामधून समोर आली आहे. 2 / 8तज्ज्ञांच्या मते सध्या पृथ्वी खूप वेगाने स्वत:भोवती फिरत आहे. तसेच २४ तासांपेक्षा कमी वेळात स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करत आहे. असे गेल्या ५० वर्षांत घडलेले नाही. 3 / 8डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार पृथ्वी वेगाने स्वत:भोवती फिरत असल्याचे २०२० च्या मध्यावर तज्ज्ञांच्या लक्षात आले होते. त्यामुळे आता संशोधकांना अॅटॉमिक क्लॉकच्या वेळेमध्येही बदल करावा लागण्याची शक्यता आहे. 4 / 8डाटा कलेक्शनच्या हिशेबानुसार १९ जुलै २०२० हा आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात लहान दिवस ठरला होता. त्या दिवशी पृथ्वी आपल्या धुरीवर १.४६०२ मिलीसेकंद आधीच पोहोचली होती. अशा परिस्थितीमुळे आता घड्याळात निगेटिव्ह लीप सेकंद जोडावा लागेल. 5 / 8१९७० पासून आतापर्यंत २७ लीप सेकंद जोडण्यात आले आहेत. २०२० च्या मध्यापासून पृथ्वी आपले परिवलन २४ तासांआधी ०.५ मिलिसेकंद आधीच पूर्ण करत आहे. याचा अर्थ दिवसाच्या २४ तासांमधून ०.५ मिलिसेकंद कमी झाले आहेत.6 / 8२०२० पूर्वी २००५ मध्ये सर्वात लहान दिवसाची नोंद झाली होती. मात्र धक्कादायक बाब म्हणजे गेल्या एका वर्षा हा विक्रम २८ वेळा तुटला आहे. 7 / 8 सर्वसामान्यांना वेळेत झालेल्या या बदलाची माहिती मिळू शकत नाही. हा बदल केवळ अॅटॉमिक क्लॉकच्या माध्यमातूनच माहिती करून घेता येऊ शकतो. 8 / 8मात्र दिवसाच्या वेळात ०.५ मिलीसेकंदांनी घट झाल्याने अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या कम्युनिकेशन सिस्टिममध्ये समस्या निर्माण होऊ शकते. त्याचे कारण आमचे सॅटेलाइट्स आणि अन्य यंत्रे ही सूर्याच्या वेळेनुसार म्हणजेच सोलर टाइमनुसार सेट होत असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications