शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अभिमानस्पद! युरोपीय देशांपेक्षा भारतीय सैन्याची ताकद जास्त; चीननं पहिल्यांदाच केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 2:47 PM

1 / 7
ल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. मात्र, दोनच दिवसांपूर्वी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याचा सकारात्मक परिणाम मंगळवारी पाहायला मिळाला. पूर्व लडाखच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकले आहे. चिनी सैन्याने त्यांची वाहनेदेखील मागे घेतली आहेत. त्यानंतर भारतानेदेखील आपले काही जवान मागे घेतले आहेत.
2 / 7
लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता लडाखमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरून चिनी सैन्य मागे सरकले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबद्दलची माहिती दिली. चिनी सैन्याने माघार घेतल्यानंतर काही भारतीय जवानदेखील मागे सरकले. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान गलवान, पेट्रोलिंग पॉइंट १५ आणि हॉट स्प्रिंग परिसरातून अडीच किलोमीटर मागे गेल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यानंतर भारतानेही काही जवानांना माघारी बोलावले.
3 / 7
लडाखच्या नियंत्रण रेषेच्या वादाच्या दरम्यान चिनच्या लष्करी तज्ञांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. चीनच्या तज्ञांनी सांगितले की, भारताकडे जगातील सर्वात मोठी आणि पठारी व डोंगराळ भागातील कामाचा अनुभव असणारे सैन्य आहे. त्यामुळे भारतासारखी ताकद इतर कोणत्याही युरोपीय देशांकडे नाही, असं चीनच्या तज्ञांनी म्हटले आहे.
4 / 7
मॉडर्न वेपनरी नियतकालिकेचे वरिष्ठ संपादक हुआंग जुओझी यांनी याबाबत एक लेख लिहीला असून भारतीय सैन्यांवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. भारताकडे पठारी प्रदेशात काम करण्याचा अनुभव असणारी सर्वात मोठी सैन्य आहे. रशिया, अमेरिका या देशांकडे देखील असा अनुभव असलेली सैन्य नाही, असं चीनच्या तज्ञांनी सांगितले.
5 / 7
गेल्या काही वर्षांत भारताने डोंगराळ भागात विशेषतः चीनच्या सीमेवर प्रशिक्षित सैनिकांची उपस्थिती वाढविली आहे. चीनमधील कोणत्याही लष्करी तज्ञाने अशाप्रकारे भारतीय सैन्याच्या सामर्थ्य व सामरिक सामर्थ्याचे कौतुक करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.
6 / 7
2 लाख सैनिकांच्या तुकड्यांना 12 विभागात विभागले गेलेली, भारतीय माऊंटन फोर्स ही जगातील सर्वात मोठी पर्वतीय लढाऊ सेना आहे. 1970 च्यानंतर भारतीय सैन्याने माऊंटन फोर्सचा विस्तार वाढविला आहे. याशिवाय 50 हजाराहून अधिक सैनिकांची माऊंटन स्ट्राइक फोर्स तयार करण्याच्या योजनेवरही भारतीय सैन्य कार्यरत असं या लेखात लिहिण्यात आले आहे.
7 / 7
सियाचीनमध्ये सारख्या भागामध्ये भारताने शेकडो आउटपोस्ट तयार केल्या आहेत. त्यामध्ये ५ हजार मीटर उंचावरील चौक्यांचा समावेश आहे. सर्वात उंचावरील चौकी ६७४९ मीटरवर असल्याचे त्यांनी म्हटले.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतladakhलडाखchinaचीनAmericaअमेरिका