Study Report: What happens when two very different respiratory viruses infect the same cell
दोन वेगवेगळे Virus एकाचवेळी शरीरावर हल्ला करतात तेव्हा काय होतं? रिपोर्टमधून खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 4:39 PM1 / 10सध्याच्या काळात व्हायरसचं नाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात SARS Cov2 म्हणजे कोरोनाचं नाव येते. परंतु इन्फ्लुऐंजा आणि रेस्पिरेटरी सिंसिशियल व्हायरलसारखे अन्यही व्हायरस श्वसनाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करत असतात. 2 / 10कोरोनाऐवजी अन्य व्हायरसही आहेत ज्याने दरवर्षी हजारो लोकांच्या मृत्यूचं कारण बनतात. इन्फ्लुऐंजा आणि कोविड १९ वगळता यापैकी कुठल्याही व्हायरसपासून बचावासाठी ना कोणती लस आहे ना औषधं. या आजारांवर उपचारही करणं अशक्य आहे. 3 / 10ग्लासगो विश्वविद्यालयाच्या अलीकडेच झालेल्या एका संशोधनात सांगितलं आहे की, जर तुमच्या शरीरावर एकापेक्षा अधिक व्हायरसनं एकाच वेळी हल्ला केला तर काय होतं? आणि या व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी काय करायला हवं? या स्थितीला को इन्फेक्शन म्हटलं जातं. 4 / 10या रिपोर्टमध्ये समजलं की, संक्रमणाच्या ३० टक्के अधिक प्रकरणात एका पेक्षा अधिक व्हायरस असू शकतात. याचा अर्थ असा आहे की, कुठल्याही वेळी दोन विविध विविध व्हायरस तुमच्या नाकाद्वारे आणि फुस्फुस्सद्वारे शरीराला संक्रमित करत असतात. 5 / 10जेव्हा वेगवेगळे विषाणू एकाच पेशीत मिसळतात तेव्हा व्हायरसचं नवीन स्वरुप समोर येते. त्याला एंटिजेनिक शिफ्ट म्हणतात. जेव्हा तुमच्या शरीरात दोन व्हायरल एकाच वेळी हल्ला करतात त्याला को-इन्फेक्शन अथवा सहसंक्रमण म्हटलं जातं. ते खूप धोकादायक असतं. 6 / 10अनेकदा काही व्हायरसच्या दुसऱ्या व्हायरसला ब्लॉक करताना नजर येतात. तर काही व्हायरस एकमेकांसोबत जुळवून घेतात. परंतु को इन्फेक्शनमुळे कोणते सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात यावर माहिती देण्यात आली नाही. परंतु प्राण्यावर केलेल्या संशोधनावरुन ही माहिती मिळवण्यास सुलभता येईल. 7 / 10ग्लासगो विश्वविद्यालयाच्या रिपोर्टमध्ये या गोष्टीची पडताळणी केलीय जेव्हा दोन ह्युमन रेस्पिरेटरी व्हायरस एकसाथ पेशींना संक्रमित करतात तेव्हा काय होतं? या प्रयोगासाठी IAV आणि RSV व्हायरसची निवड करण्यात आली. हे दोन सामान्य व्हायरस आहेत. परंतु दरवर्षी हा व्हायरस लोकांच्या आजारपणाचं आणि मृत्यूचं कारण बनतो. 8 / 10IAV आणि RSV ने पेशींना संक्रमित केले गेले. त्यात संशोधनकर्त्यांना आढळलं की, क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कॉपीसारख्या उच्च रिझॉल्यूशन इमेजिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रत्येक व्हायरससोबत काय घडतं? मानवी शरीरातील काही पेशी दोन्ही व्हायरसनं संक्रमित झाल्या. 9 / 10तर पेशीमधून जो व्हायरल नव्याने निर्माण झाला त्यात दोन्ही व्हायरसचं वैशिष्ट होतं. नव्या स्वरुपात काही प्रमाणात दोन्ही व्हायरसचे प्रोटीन तर काहीमध्ये दोन्हीचे जीन पण एकच असल्याचं आढळलं. रुग्णांवर लस आणि उपचारांच्या विकासासाठी सूक्ष्मजीवांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे.10 / 10परंतु सर्वप्राधान्य सुरक्षेला आहे. इथं हेदेखील सांगायला हवं की, संशोधनकर्त्यांनी या रिपोर्टमध्ये कुठलंही जेनेटिक इंजिनीअरिंग केले नाही. तर मॉडेलच्या माध्यमातून जे सध्या घडत आहेत तेच समजवून सांगितले आहे. आणि हा प्रयोगदेखील लॅबमध्ये सुरक्षित वातावरणात केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications