1 / 7इटलीमध्ये तलावाच्या तळाला १६० घरे असलेला एक गाव सापडला आहे. तळ्याचे पाणी कमी झाल्यानंतर हा गाव दिसून आला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते हा गाव क्वचितच दृष्टीस पडतो. त्यामुळे या गावाला भूतांचा गाव म्हणून ओळखले जाते. 2 / 7cbsnews.comच्या रिपोर्टनुसार इटलीमधील या तळ्यामध्ये अनेक दशकांनंतर दिसून आलेल्या या गावाचे नाव कुरोन आहे. १९५० मध्ये या गावात वीज सयंत्राची स्थापना करण्यात आली होती. त्याचवेळी या गावात महापूर आला. त्यात हा गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. 3 / 7ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडला लागून असलेल्या इटलीच्या सीमेजवळ असलेल्या तलावामधून एका जलाशयाच्या दुसुस्तीसाठी पाणी कमी करण्यात येत आहे. त्यामुळे जसजशी पाण्याची पातळी कमी होत आहे. तसतसा १६० घरे असलेला हा गावा समोर येत आहे. 4 / 7सुरुवातील १४ व्या शतकातील एका चर्चची मिनार पाण्याबाहेर आली. नंतर पाण्याची पातली घटू लागल्यावर तलावाच्या तळाशी असलेल्या या गावातील गुहा आणि भिंती दिसू लागल्या. 5 / 7इटलीमधील तलावात बुडालेल्या या गावाबाबत क्युरॉन नावाची एक वेबसीरिजसुद्धा तयार झाली आहे. याशिवाय या गावावर एक पुस्तकही लिहिले गेले आहे. ज्यामध्ये या या गावाची संपूर्ण कहाणी सांगण्यात आली आहे. 6 / 7येथे राहणाऱ्या एका महिलेने ट्विट करून सांगितले की, जुन्या घरांच्या अवशेषांवरून चालणे हा एक अजब अनुभव होता. हा भाग हायकर्ससाठी खूप लोकप्रिय आहे. त्यांच्याद्वारे गावाचे भयावह चित्र सोशल मीडियावर व्हायरल केले गेल आहे. 7 / 7तर एका अन्य ट्विटर युझरने लिहिले आहे की, हे कुरोन नावाच्या गावाचे अवशेष आहेत. हे गाव अनेक दशकांपूर्वी बुडाले होते. इटलीमधील लेक रसियामधून पाणी बाहेर काढताना हे अवशेष आता बाहेर आले आहेत.