Sunita Williams: ना चपाती, ना भात, ना बिस्किट... सुनीता विल्यम्स यांनी २८६ दिवस अंतराळात काय खाल्लं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:51 IST
1 / 10गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवरील घरवापसीला आता काही तासच उरले आहेत. 2 / 10आंतरराष्ट्रीय अंतराळ केद्रामधून स्पेसक्राफ्ट अनडॉक झालं असून ते भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे ३.३० वाजता समुद्रात उतरण्याची शक्यता आहे.3 / 10६१ वर्षीय बुच विल्मोर आणि ५९ वर्षीय सुनीता विल्यम्स गेल्या २८६ दिवसांपासून अंतराळात अडकले आहेत.4 / 10अंतराळ संस्थेचे डॉक्टर त्याच्या आहारावर आणि आरोग्यावर लक्ष ठेवून होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल, ते नेमके काय खात आहेत याबद्दल प्रश्न पडले आहेत.5 / 10स्टारलाइनर मिशनशी संबंधित एका तज्ज्ञाने काही काळापूर्वी द पोस्टला सांगितलं होतं की ते दोघेही विविध प्रकारचं अन्न खात आहेत.6 / 10आहारात व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थ होते. पावडर दुधासह धान्य, पिझ्झा, कोळंबी, कॉकटेल, रोस्ट चिकन आणि टूना फिश यांचा समावेश होता.7 / 10कोणतेही मांसाहारी पदार्थ आणि अंडी पृथ्वीवर शिजवली जातात आणि पॅक केली जातात. अंतराळात फक्त गरम केली जातात.8 / 10नासाने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर प्रत्येक अंतराळवीराला दररोज जवळपास १.७२ किलो अन्न पुरवलं जातं.9 / 10बहुतेक अंतराळवीरांचं अन्न फ्रीज, ड्राय किंवा पॅक केलेलं असतं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरील फूड वॉर्मर वापरून ते पुन्हा गरम करता येतं.10 / 10मिशनच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी अन्न साठवण्याची सुविधा देखील आहे.