Sunita Williams in danger Cracks in International Space Station, multiple leaks
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 12:35 PM1 / 8अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात थोडीशी गळती सुरू होती. 2 / 8आता या गळतीत वाढ झाली आहे. अंतराळ स्थानकाला ५० हून भेगा वाढल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे सुनीता विल्यम्स यांना धोका आहे.3 / 8नासाने केलेल्या तपासणीत लीक झाल्याचे समोर आले आहे.यामध्ये आंतरराष्ट्रीय स्थानकाला धोका निर्माण झाला आहे. आता अंतराळवीरही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.4 / 8पृथ्वीच्या कक्षेतील प्रयोगशाळेत सूक्ष्म कंपने होत असल्याचा इशाराही रशियाने दिला आहे. नासाने सांगितले की, स्पेस स्टेशनमधून मोठ्या प्रमाणात हवा बाहेर पडत आहे, ही धोक्याची घंटा आहे. मात्र, नासा अंतराळविरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.5 / 8या समस्येवर रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉस आणि नासा यांचे एकमत झालेले नाही. सीएनएनच्या वृत्तानुसार, नासाचे अंतराळवीर बॉब कबाना यांनी सांगितले आहे की, दोन्हीनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.6 / 8सुनीता विल्यम्स जूनपासून त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्यासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहेत. दोघेही १५० हून अधिक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकून पडले आहेत.7 / 8दोन्ही अंतराळवीरांनी ५ जून रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून उड्डाण केले आणि ६ जून रोजी आयएसएसवर पोहोचले. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये ते परतण्याची शक्यता आहे.8 / 8सुनीता विल्यम्स यांच्या प्रकृतीची माहिती देताना नासाने पुन्हा एकदा दिलासादायक बातमी दिली आहे. अंतराळात उपस्थित असलेले सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे नासाने म्हटले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications