शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आश्चर्य...जपानमध्ये 400 वर्षे जुन्या मंदिरातील पुजारी झाला 'अमर'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 5:00 PM

1 / 7
आतापर्यंत आपण रोबोटला एखाद्या कंपनीमध्ये काम करताना, ऑपरेशन करताना किंवा घरातील कामे करताना फोटो, व्हिडीओंमध्ये पाहिले असेल. मात्र, जपानमध्ये अशाप्रकारचा रोबो तब्बल 400 वर्षे जुन्या मंदिरामध्ये पुजाऱ्याच्या भुमिकेत दिसणार आहे.
2 / 7
रोबोट पुजाऱ्याला पाहून तेथील लोक बौद्ध धर्मामध्ये दिलचस्पी दाखवत आहेत. तर काही टीकाकारांनी या रोबोची तुलना फ्रँकस्टीनच्या राक्षसाशी केली आहे.
3 / 7
अँड्रॉईडवर आधारित असलेला हा रोबोट पुजारी क्योटोच्या कोडाईजी मंदिरामध्ये उपदेश देत आहे. या पुजाऱ्यासोबत वावरणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सोबत मिळून रोबोट कमालीची कामे करू शकतो.
4 / 7
मंदिराचे पुजारी टेन्शो गोटो यांनी सांगितले की, हा रोबोट कधी मरणार नाही. तसेच तो वेळेनुसार अपडेट होत राहील. हा रोबो आजीवन माहिती साठवू शकणार आहे. हा एक बौद्ध धर्मामधील मोठा बदल मानता येईल.
5 / 7
हा रोबोट हात, चेहरा आणि खांदा हलवू शकतो. त्याची त्वचा माणसासारखी दिसण्यासाठी त्याच्यावर सिलीकॉन लेयर लावण्यात आला आहे. हा पुजारी पात जोडून प्रार्थनाही करू शकतो.
6 / 7
या रोबोच्या डाव्या डोळ्यात एक छोटासा कॅमेरा आहे. याची बॉडी अॅल्यूमिनीअमची आहे.
7 / 7
या पुजाऱ्याला ओसाका विश्वविद्यालयाच्या जैन मंदिर आणि प्रसिद्ध रोबोटिक्स प्राध्यापक हिरोशी इशिगुरो यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. यासाठी त्यांना जवळपास 7 कोटी 11 लाख 12 हजार 500 रुपयांचा खर्च आला आहे.
टॅग्स :JapanजपानRobotरोबोट