स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी; मुस्लीम संघटनांनी व्यक्त केली नाराजी By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 3:43 PM
1 / 10 स्वित्झर्लंडमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर प्रतिबंध घालण्याच्या बाजूनं नागरिकांनी कौल दिला आहे. रविवारी स्वित्झर्लंडमध्ये सार्वमत घेण्यात आलं होता. यामध्ये ५१.२ टक्के मतदारांनी चेहरा झाकण्यावर प्रतिबंध घालण्याच्या बाजूनं मतदान केलं. 2 / 10 हा प्रस्ताव फार कमी अंतराच्या फरकानं पारित झाला. सार्वमत घेणाऱ्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार प्रतिबंध घालण्याच्या बाजूनं १,४२६,९९२ लोकांनी तर त्या प्रस्तावाच्या विरोधात १,३५९,६२१ लोकांनी मतदान केलं. मतदानाची टक्केवारी ५०.८ टक्के इतकी होती. 3 / 10 हा बॅन लागू झाल्यानंतर हिजाब परिधान करण्यावरही बंदी असेल. या प्रस्तावात इस्लाम आणि बुर्ख्याबाबत थेट उल्लेख नाही. परंतु अनेक राजकारणी आणि मुस्लीम संघटनांनी या बुरख्यावर बंदी आणि इस्लामोफोबियानं ग्रासलेलं म्हटलं आहे. यापूर्वी २००९ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये मिनारांच्या निर्मितीवर बंदी घालण्यासाठीही सार्वमत घेण्यात आलं होता. 4 / 10 बॅन लागू झाल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकता येणार नाही. परंतु धार्मिक स्थळं, कार्निव्हल सेलिब्रेशन आणि आरोग्य कारणांसाठी यातून सूट देण्यात आली आगे. काही युरोपियन देशांमध्ये यापूर्वीच अशी बंदी घालण्यात आली आहे. 5 / 10 फ्रान्सनं २०११ मध्ये चेहरा पूर्ण झाकणारे कपडे परिधान करण्यावर बंदी घातली होती. डेनमार्क, ऑस्ट्रिया, नेदरलँड्स आणि बल्गेरिया या देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करण्यावर आंशिक अथवा पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. 6 / 10 मुस्लीम संघटनांनी यावर आक्षेप घेत या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं म्हटलं. 'हा निर्णय जुन्या जखमा पुन्हा उघडण्यासारखा आहे. कायद्याच्या दृष्टीनं असमानतेचा विस्तार करणारा आहे. या निर्णयामुळे मुस्लीम अल्पसंख्यकांना वेगळं करण्याचा संदेश जात आहे. या निर्णयाला आव्हान दिलं जाईल आणि ज्या महिलांकडून दंड आकारला जाईल त्यांच्या मदतीसाठी निधी गोळा केला जाईल,' अशी प्रतिक्रिया स्वित्झर्लंडमधील सेंट्रल काऊन्सिल ऑफ मुस्लीमकडून देण्यात आला. 7 / 10 'संविधानात ड्रेसकोडशी निगडीत नियम आणणं म्हणजे महिलांच्या मुक्तीसाठी उचललेलं पाऊल नाही तर भूतकाळात एक पाऊल मागे जाण्यासारखं आहे. या चर्चेमुळे स्वित्झर्लंडची सहिष्णुता, शांतीप्रियता आणि तटस्थ मूल्यांना नुकसान पोहोचल्याचं,' स्वित्झर्लंडच्या फेडरेशन ऑफ इस्लामिक ऑर्गनायझेशननं सांगितलं. 8 / 10 'हे मतदान इस्लामच्या विरोधात नाही. परंतु बुरखा परिधान करणं कट्टर इस्लामचं राजकारणाचा भाग झाला आहे. युरोपमध्ये इस्लामचं राजकारण करण्याचे प्रकार वाढले आहेत. परंतु स्वित्झर्लंडमध्ये याला जागा नाही. तुम्ही तुमचा चेहरा दाखवा ही स्वित्झर्लंडची परंपरा आहे आणि मूलभूत स्वातंत्र्याचं प्रतीकही आहे,' असं पीपल्स पार्टीचे खासदार आणि रेफरँडम कमिटीचे सदस्य वॉबमन यांनी सांगितलं. 9 / 10 युनिव्हर्सिटी ऑफ लूसर्नच्या माहितीनुसार स्वित्झर्लंड फारच कमी महिला बुरखा परिधान करतात. केवळ ३० टक्के महिला याचा वापर करतात. स्वित्झर्लंडमध्ये ५.२ टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. यापूर्वी बहुतांश तुर्कस्थान, बोन्सिया आणि कोसोवो येथील आहेत. 10 / 10 'अशा प्रकारची बंदी ससम्या सोडवू शकत नाही म्हणून आपण याच्या विरोधात आहोत. येथील मुस्लीम लोकं वेगळी नाहीत. संविधानात बदल करून या ठिकाणची लोकं कोणते कपडे परिधान करू शकतात किंवा नाही हे सांगणं चुकीचा विचार आहे. हा स्वित्झर्लंड आहे सौदी अरेबिया नाही,' असं रिफा लेन्जिन या स्विस महिलेनं सांगितलं. आणखी वाचा