Taiwan travelers take sightseeing flight to nowhere
This Is Business! विमान कंपनीनं भन्नाट शक्कल लढवली; हजारो-लाखोंची तिकिटं हातोहात खपली By कुणाल गवाणकर | Published: September 20, 2020 4:47 PM1 / 10कोरोनाचा फटका संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. जवळपास सगळ्याच क्षेत्रांची अवस्था दयनीय झाली आहे.2 / 10कोरोना काळात सर्वसामान्यांच्या फिरण्यावर बंधनं आली आहेत. त्यामुळे पर्यटन, वाहतूक व्यवसायाचे तीन-तेरा वाजले आहेत.3 / 10कोट्यवधी माणसं वर्क फ्रॉम होम करताहेत. त्यामुळे प्रवास आणि त्यावरील खर्च पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे वाहतूक, पर्यटन व्यवस्थेवर पोट भरणाऱ्यांचे हाल होत आहेत.4 / 10कोरोना काळात विमान वाहतूक जवळपास ठप्प आहे. त्यामुळे अनेक विमान कंपन्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. मात्र यातही काही कंपन्यांनी वेगळीच शक्कल लढवली.5 / 10कोरोना काळात हवाई प्रवासावर बंदी आहे. मात्र हवाई प्रवासाची, त्याची आवड असणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशांसाठी हवाई कंपन्यांनी वेगळ्याच ऑफर सुरू केल्या आहेत.6 / 10हवाई प्रवास घडणार, पण तुम्ही कुठेच नाही पोहोचणार, अशा भन्नाट ऑफर सुरू झाल्या आहेत. या नव्या ऑफरला जबरदस्त प्रतिसादही मिळू लागला आहे.7 / 10ग्राहकांना विमानात बसवायचं, काही वेळ आकाशात फिरवून आणायचं आणि मग पुन्हा ज्या विमानावरून उड्डाण केलं, तिथेच विमानं उतरवायचं, अशी ही नवी योजना आहे. हवाई वाहतुकीतला हा सध्याचा ट्रेंड आहे.8 / 10विशेष म्हणजे यासाठी प्रवासी जास्त पैसा मोजायलाही तयार आहेत. शनिवारी Tigerair Taiwan एअरलाईन्सच्या विमानानं १२० प्रवाशांना घेऊन असाच प्रवास केला. २१०० किमी अंतर कापून विमानं पुन्हा लँड झालं.9 / 10Tigerair Taiwan एअरलाईन्सच्या विमानानं तैवानहून उड्डाण केलं. दक्षिण कोरियाच्या हॉलिडे आयलँड जेजूजवळून या विमानानं फेरफटका मारला. प्रवाशांना काही प्रेक्षणीय स्थळं दाखवली. 10 / 10कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विमान कंपन्यांना प्रचंड तोटा झाला. मात्र नव्या ऑफरमुळे कंपन्यांचा तोटा काही प्रमाणात भरून निघत आहे. वैमानिकांना त्यांचा परवाना रद्द होऊ नये यासाठी काही तास उड्डाण करणं गरजेचं असतं. कंपन्यांची ऑफर त्या दृष्टीनंदेखील उपयोगी ठरतेय. आणखी वाचा Subscribe to Notifications