ISISच्या मार्गावर तालिबान! सेक्स गुलाम बनविण्यासाठी घराघरात घुसून मुलींना पळवू लागले, महिलांवर संकट By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 4:06 PM
1 / 10 अमेरिकेच्या आणि नाटो सैनिकांनी अफगानिस्तानातून काढता पाय घेतल्याने तालिबान पुन्हा वेगाने हातपाय पसरू लागला आहे. मात्र, यामुळे अफगान सरकारच्याच नाही तर तेथील महिलांवरही मोठे संकट ओढवले आहे. 2 / 10 द सन वेबसाईटने केलेल्या दाव्यानुसार तालिबानचे दहशतवादी घरोघरी जाऊन तरुणींचा शोध घेत आहेत. या तरुणींना उचलून नेऊन त्यांना सेक्स गुलाम बनविले जात आहे. 3 / 10 तालिबानचे नेते आता अफगानिस्तानच्या तरुणींचे अपहरण करून त्यांच्यासोबत बळजबरीने लग्न करून सेक्स गुलाम बनविण्याचे कामही करू लागले आहेत. 4 / 10 तालिबानचे हे कृत्य इराक आणि सीरियामध्ये असलेल्या इस्लामिक स्टेटच्या क्रूरतेसारखेच आहे. ही संघटना महिलांना सेक्स गुलाम बनविण्यासाठी कुख्यात आहे. तेथील काही महिलांनी कशीबशी सुटका करून घेऊन आयएसआयएस दहशतवाद्यांच्या कृत्याचा भांडाफोड केला होता. 5 / 10 गेल्या महिन्यात द सनच्या रिपोर्टमध्ये समोर आले होते की, तालिबानच्या कब्ज्यातील भागात असलेल्या इमामांना 15 वर्षांहून अधिक व 45 वर्षांच्या आतील तरुणी आणि विधवा महिलांच्या नावाची यादी तालिबानला देण्यास सांगितले होते. 6 / 10 या महिलांचे लग्न तालिबान त्यांच्या दहशतवाद्यांशी करून देणार आहे. मात्र, आता तालिबान बळजबरीने आणि किडनॅप करून घराघरातून महिलांना पळवून नेत आहे. 7 / 10 ब्ल्यूमबर्गच्या रिपोर्टनुसार या कृत्यामुळे तालिबानच्या कब्ज्यातील भागातील महिलांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. तसेच आता जे भाग नाहीत, आणि तालिबानच्या ताब्यात जातील अशा भागातही भयाची लाट पसरली आहे. 8 / 10 शरीया कायदा लावला तर या महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. या कायद्यानुसार महिला कोणत्याही पुरुष साथीदाराशिवाय घराच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. 9 / 10 या प्रकरणावर बोलताना अफगानचे हाय काऊंन्सिल ऑर नॅशनल रिकन्सिलिएशनचे सदस्य फारुखंदा जाहरा नादेरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. सर्वात मोठी भीती म्हणजे तालिबान आता वरिष्ठ पातळीवरील महिला नेत्यांना घेरण्यात आणि त्यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात करत आहे. 10 / 10 जर तालिबानने महिला नेत्यांना नुकसान पोहोचवले तर देशातील महिलांच्या बाजुने त्यांची बाजू कोण मांडणार? गेल्या 20 वर्षांतील झालेला विकास कोण वाचवणार? आणखी वाचा