शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तालिबानी मोजून दमले! पाकिस्तान सीमेनजीक अफगान सैन्याच्या चौकीवर तीन अब्ज रुपये सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 3:29 PM

1 / 11
इस्‍लामाबाद/कंधाहार : अफगानिस्तान (Afghanistan) युद्धापासून आजवर अब्जावधी डॉलर खर्च करून अमेरिकेने काढता पाय घेतला. परंतू तिथे पुन्हा तालिबानने कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरे ताब्यात घेतली असून अफगानिस्तान सैन्याची मोठी पिछेहाट झाली आहे. (Taliban flag raised above Afghanistan's border crossing with Pakistan in major advance)
2 / 11
बुधवारी तालिबानने दाढी कापणे, स्त्रियांनी एकट्याने बाहेर न पडणे यासाठी फतवा जारी केला आहे. तालिबान सैन्याच्या आणि पोलिसांच्या चौक्या ताब्यात घेऊ लागले आहे.
3 / 11
अशातच तालिबान्यांच्या हाती एक चौकी लागली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) सीमेला लागून असलेल्या या चौकीमध्ये तालिबानी अतिरेक्यांना घबाड मिळाले आहे. या घबाडाचा उपयोग सहाजिकच दहशतवादी कारवायांसाठी केला जाणार असल्याने चिंता वाढली आहे.
4 / 11
पाकिस्तानला लागून असलेल्या कंधाहर प्रांतातील स्पिन बोल्डाक भागात सीमेवर सैन्याची आहे. या चौकीवर तालिबान्यांनी कब्जा केला आणि त्यांचे नशीबच फळफळले आहे.
5 / 11
तालिबानी अतिरेक्यांच्या हाती तीन अब्ज रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. हा खजाना तिथेच टाकून अफगान लष्कर चौकी सोडून पळून गेले होते. आता तो तालिबानच्या हाती लागला आहे. तालिबाननेच याची माहिती दिली आहे. हे पाकिस्तानी रुपये आहेत.
6 / 11
पाकिस्तानी टीव्ही चॅनल जिओ न्यूजने ही माहिती दिली आहे. अफगानिस्तानमध्ये तालिबान भीषण हल्ले करू लागला आहे. त्यांच्या दाव्यानुसार तालिबानने देशाच्या ८५ टक्के भागावर कब्जा केला आहे.
7 / 11
बुधवारी स्पिन बोल्डाक सीमेवरील चौकीवर त्यांनी हल्ला केला. दुसऱ्या देशांच्या सीमांवर कब्जा करण्याची मोहिम तालिबानने तीव्र केली आहे. याद्वारे होणाऱ्या व्यापारातून कमाई करण्याचा तालिबानचा विचार आहे. हा पैसा ते पुढील मोहिमांना, शस्त्र खरेदी आदीसाठी वापरणार आहेत.
8 / 11
तालिबानने कंधाहर मधील महत्वाचा रस्ता ताब्यात घेतला आहे. यामुळे तेथील सीमा शुल्क विभागही तालिबानच्या ताब्यात आल्याची घोषणा प्रवक्‍ता जबिउल्‍लाह मुजाहिदने केली आहे.
9 / 11
धक्कादायक बाब म्हणजे अफगानिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या घटनेची कल्पना नसल्याचे सांगितले असून याची चौकशी केली जात असल्याचे म्हटले आहे.
10 / 11
दुसरीकडे तालिबानने अफगान सरकारचा झेंडा उतरवून त्याजागी त्यांचा पांढरा झेंडा फडकविला आहे.
11 / 11
अफगानच्या सुरक्षा रक्षकांनी तस्करांकडून लाच स्वरुपात हे पैसे जमा केले होते. हा एक महत्वाचा खुश्कीचा मार्ग होता, असा दावा पाकिस्तानी विश्लेषकांनी केला आहे.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाterroristदहशतवादी