शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Afghanistan Taliban Crisis: ११ सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तान सोडा, अन्यथा...; तालिबानचा अमेरिकेला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 2:01 PM

1 / 11
भारतात १५ ऑगस्टला संपूर्ण देश ७५ वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करत होता. त्याचदिवशी अफगाणिस्तानात मोठा हिंसाचार सुरु होता. तालिबाननं अफगाणिस्तानवर(Afghanistan) कब्जा केला. राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींनी संसद, राष्ट्रपती भवनावर कब्जा केला.
2 / 11
अफगाणिस्तानातील अस्थिरता कमी संपेल याची कुणालाही शाश्वती नाही. अफगाणिस्तान सैनिक लढत नाही मग कधीपर्यंत अमेरिकेचे सैन्य पाठवत राहू असं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी करत तेथील जनतेला प्रश्न विचारला आहे.
3 / 11
ज्या चुका आम्ही याआधी केल्या आहेत त्या पुन्हा करणार नाही असं स्पष्टपणे बायडन यांनी सांगितले. २० वर्षानंतर अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आली आहे. तालिबानी सत्तेमुळे देशातील नागरीक दहशतीच्या वातावरणात जगत आहेत.
4 / 11
आता तालिबानने अमेरिकेला ११ सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तान सोडण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने त्यांचे सर्व सैनिक परत बोलवावेत असं तालिबानने म्हटलं आहे. अमेरिकेचे ६ हजार सैनिक अद्यापही अफगाणिस्तानात उपस्थित आहेत.
5 / 11
अमेरिकेने २००१ पासून तालिबानविरुद्ध युद्ध पुकारले होते. तालिबानी राजवट संपुष्टात आणल्यानंतर २० वर्षांनी आज पुन्हा अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेले आहे. या कालावधीत अमेरिकेने तब्बल २ लाख कोटी रुपयांहून अधिक पैसा खर्च केला आहे.
6 / 11
अफगाणिस्तानावर तालिबानचा ताबा आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी देश सोडून पळालेले अशरफ गनी यांना दोषी ठरवले आहे. देशाच्या जनतेच्या मदतीसाठी ठामपणे उभं राहण्याऐवजी ते न लढताच पळून गेले अशी टीका बायडन यांनी केली आहे.
7 / 11
जनतेने अशरफ गनी यांना जाब विचारला पाहिजे. २० वर्षांनी अतिशय कठीण निर्णय घेतला आहे. अमेरिकन सैन्य माघारीसाठी कोणतीच वेळ चांगली नव्हती. आम्ही धोका पत्करला. अल-कायदाचा खात्मा केला. ट्रम्प काळात १५ हजाराहून अधिक सैनिक अफगाणिस्तानात होते.
8 / 11
आमचे सरकार आल्यानंतर केवळ २ हजार सैनिक राहिले होते परंतु आता ६ हजार सैनिक काबुल विमानतळाचे संरक्षण करत असल्याचे बायडन यांनी सांगितले. अमेरिकेचे सैनिक तेथून परत येत आहेत. त्यांच्यावर हल्ला झाला तर कठोर कारवाई करु असंही बायडन यांनी बजावलं आहे.
9 / 11
अमेरिकेने यापूर्वीच जास्तीत जास्त सैनिक पुन्हा बोलावले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून सर्व सैनिक पुन्हा मायदेशी आणण्याची योजना अमेरिकेने आखली आहे. परंतु तत्पूर्वी तालिबानने ११ सप्टेंबरपर्यंत सैनिक माघारी न्या असा इशाराच अमेरिकेला दिला आहे.
10 / 11
दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर रशियाने अमेरिकेला चिमटे काढलेत. तालिबानने केवळ २४ तासांमध्ये काबुल पूर्वीपेक्षा सुरक्षित केल्याची प्रतिक्रिया रशियाचे अफगाणिस्तानातील राजदूत दिमिन्नी झिर्नोव्ह यांनी दिली आहे.
11 / 11
चीन, पाकिस्ताननंतर रशियाने तालिबानी राजवटीला समर्थन देण्याचे संकेत दिले आहेत. तर भारताने अफगाणिस्तानात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तालिबानबाबत भूमिका ठरवू असं म्हणत वेट अँन्ड वॉच ठेवलं आहे.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानAmericaअमेरिका