taliban was keeping an eye on the embassy know how indian employees came out to save their lives
दुतावासात अडकले भारतीय अधिकारी, बाहेर शस्त्रधारी तालिबानी; थरारक मिशनची इनसाईड स्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 2:03 PM1 / 10अफगाणिस्तानवर तालिबाननं पूर्ण कब्जा केला असून संपूर्ण देशात अस्थिरता पसरली. लाखो नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. कित्येक जण देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र त्यांना वाटच सापडत नाही. 2 / 10अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली. त्यासाठी हवाई दलाची दोन सी-१७ ग्लोबमास्टर विमानं वापरण्यात येत आहेत. 3 / 10अफगाणिस्तानमधील भारतीयांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलं असून एक ते दोन दिवसांत त्यांना मायदेशात आणण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अफगाणिस्तानातल्या भारतीयांची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. 4 / 10अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील परिस्थितीदेखील नियंत्रणाबाहेर गेल्यानं भारतानं तिथल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यात असंख्य अडथळे आले. तालिबानच्या दहशतवाद्यांची भारतीय दूतावासावर करडी नजर होती.5 / 10एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, १५-१६ ऑगस्टच्या रात्री काबुलमधील स्थिती हाताबाहेर गेली. भारतीय दूतावासावर तालिबान्यांची नजर होती. तालिबानचे दहशतवादी हाय सिक्युरिटी ग्रीन झोनमध्ये पोहोचले होते.6 / 10भारतात येणारे अफगाणी नागरिक शाहीर व्हिसा एजन्सीच्या माध्यमातून व्हिसा मिळतात. तिथे तालिबान्यांनी छापा टाकला. त्यामुळे भारतात येऊ इच्छिणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या.7 / 10भारतीय दूतावासातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मायदेशी परतताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. काबुल विमानतळावर आधीच हजारो अफगाणी नागरिकांची गर्दी होती. रस्त्यावरदेखील नागरिकांची तोबा गर्दी असल्यानं वाट काढणं अवघड होतं.8 / 10विमानतळाचा रस्ता बंद आणि विमानतळावर आधीपासूनच मोठी गर्दी अशी दुहेरी अडचण असल्यानं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे अमेरिकन समकक्ष असलेल्या अँटनी ब्लिंकन यांच्याशी संवाद साधला. या एकाच फोननं सर्व सूत्रं हलली.9 / 10काबुलचा विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात आहे. हवाई नियंत्रण कक्षावरही त्यांचं नियंत्रण असल्यानं ब्लिंकन यांच्यासोबत संवादानंतर चक्रं फिरली. भारतीय दूतावासातील कर्मचारी मंगळवारी सकाळी विमानात बसले.10 / 10दूतावासातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेलं विमान थोड्याच वेळापूर्वी गुजरातमधल्या जामनगरमध्ये उतरलं आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. आणखी वाचा Subscribe to Notifications