शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त १० सेकंदात जमीनदोस्त झाली १४४ मजली इमारत, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 17:47 IST

1 / 8
इमारत बांधण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मात्र, ती जमीनदोस्त करण्यासाठी काही सेकंद लागतात. युएईच्या अबूधाबीमध्ये काही असेच घडले. जिथे 144 मजली इमारत अवघ्या 10 सेकंदात पाडण्यात आली.
2 / 8
सर्वात कमी वेळेत येथील मीना प्लाझाचा एक भाग असलेली 144 मजली इमारत कोसळल्यानंतर हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला. याआधी इतकी उंच इमारत कमी वेळेत कधीच पाडली गेली नव्हती.
3 / 8
165 मीटर उंचीची ही इमारत टॉवर नियंत्रित डायनामाइट लावून स्फोट करून जमीनदोस्त करण्यात आला. ही इमारत मीना प्लाझाचा एक भाग होता.
4 / 8
ही इमारत पाडण्यासाठी 915 किलो स्फोटके 3000 हून अधिक डिटोनेटर्सद्वारे अॅक्टिव्ह केली गेली, त्यानंतर ही इमारत पाहता-पाहता जमीनदोस्त झाली.
5 / 8
सर्वात महत्वाची बाब म्हणजे, 144 मजली या इमारतीला जमीनदोस्त करण्यासाठी सर्वात कमी वेळ लागला. त्यामुळे या इमारतीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. या इमारतीची उंची 165.032 मीटर (541.44 फूट) होती.
6 / 8
27 नोव्हेंबर 2020 रोजी संयुक्त अरब अमिरातीच्या अबू धाबीमध्ये मोडन प्रॉपर्टीज (यूएई) द्वारे खरेदी केली गेली होती.
7 / 8
इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याची घोषणा अबू धाबी मीडिया ऑफिस आणि अबू धाबीचे नगरपालिका व परिवहन विभागाने (डीएमटी) लगेच केली.
8 / 8
इमारत पाडण्यापूर्वी बंदर परिसरातील दुकाने आणि बाजारपेठ तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. मोडनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल ऑरेगॉन यांनी गल्फ न्यूजला सांगितले की, इमारत पाडल्यानंतर सध्या त्या जागेची पाहणी केली जात आहे.
टॅग्स :DubaiदुबईBuilding Collapseइमारत दुर्घटना