ten thousand earthquakes recorded in atlantic country iceland in one week
एक, दोन नव्हे; 'या' देशात ७ दिवसांत तब्बल १० हजार वेळा भूकंपाचे धक्के! By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 3:04 PM1 / 7उत्तर अटलांटीकमधील आइसलँड देशात गेल्या आठवड्याभरापासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. हे धक्के अजूनही अधूनमधून बसत आहेत. 2 / 7आइसलँडमधील भूकंपाची तीव्रता ५.७ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. 3 / 7युनिव्हर्सिटी ऑफ आइसलँडमधील प्राध्यापक बेनेडिक्ट होल्डरसेन यांच्या माहितीनुसार गेल्या आठवड्याभरापासून आइसलँडमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत. 4 / 7भूकंप जणू आता तिथलं दैनंदिन दिनक्रम झाल्यासारखं झालं आहे. लोकांनाही भूकंपाच्या धक्क्यांची सवय झाली आहे. त्यासाठीची पूर्वतयारीच लोक घरात करुन ठेवत आहेत. 5 / 7भूकंपाची चाहूल लागली की लोक घरात खुर्ची आणि बेडखाली डोक्यावर हात घेऊन दडून बसतात. 6 / 7भूकंपाचा एक धक्का देखील मोठा विद्ध्वंस घडवू शकतो. पण आइसलँडमध्ये रोजचे भूकंपाचे छोटे धक्के आता दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. 7 / 7भूकंप हा आता आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे या परिस्थितीत जगताना सर्व गोष्टींसाठी आपण तयार राहायला हवं, असं प्राध्यापक बेनेडिक्ट यांनी सांगितलं. आणखी वाचा Subscribe to Notifications