शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भीषण अपघात! १०० गाड्या एकमेकांवर आदळल्या अन् सहा जणांचा झाला मृत्यू तर जवळपास ६५ जण जखमी 

By पूनम अपराज | Published: February 12, 2021 4:23 PM

1 / 8
या भीषण अपघातात अंदाजे ६५ जण जखमी झाले आहेत. आय-३५ या रस्त्यावर सकाळी सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
2 / 8
या भयानक अपघातात अनेक जण गाड्यांमध्ये अडकून पडले आहेत अशी माहिती फोर्ट वर्थ पोलिसांनी दिली.
3 / 8
तीन गंभीर जखमींसह ३६ जणांना घटनास्थळावरून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
4 / 8
अनेकांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर अनेकजण घटनास्थळाहून स्वत: निघून गेले आणि नंतर रुग्णालयात भरती झाले.
5 / 8
या अपघातातील सर्व जण प्रौढ होते, यात लहान मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितलं.
6 / 8
कडाक्याच्या थंडीत कोसणाऱ्या पावसामुळे आय-३५ या फोर्ट वर्थ हायवे ओला झाला होता. त्यामुळे निसरड्या रस्त्यामुळे आणि धुक्यामुळे समोरचे दिसत नसल्यामुळे जवळपास १०० हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला असावा असा फोर्ट वर्थ पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
7 / 8
अमेरिकेत गेल्या तीन दशकांमध्ये इंटरस्टेट भीषण अपघात झाल्याचा इतिहास आहे. १४मे १९८८ ला केंचुकीतील काराल्टोनजवळ मद्यपान केलेल्या ड्रायव्हरने गाडी बेदरकारपणे चालविल्याने २७ जणांचा मृत्यू झाला होता. 
8 / 8
या अपघातात २४ लहान मुलांचा समावेश होता. टेनेससीमधील कॅलहॉनमध्ये  ११ डिसेंबर १९९० रोजी ७५ गाड्या धुक्यामुळे एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला होता. कॅलिफोर्नियातील कोलिंगाच्या जवळ २९ नोव्हेंबर १९९१ ला धुळीच्या वादळामुळे ५ गाड्या एकमेकांवर आदळल्याने १७ जणांचा बळी गेला होता. 
टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAmericaअमेरिका