थायलॅंडच्या राजाने पायलट गर्लफ्रेन्डला दिलं खास गिफ्ट, काही दिवसांपूर्वीच तिचे न्यूड फोटो झाले होते लीक....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 09:20 IST
1 / 9थायलॅंडचे राजा Maha Vijralongkorn हे त्यांच्या शाही लाइफस्टाईलसाठी आणि रंगेलपणासाठी नेहमीच चर्चेत असतात. कोरोना काळात ते त्यांची महिलांची एक खास टीम घेऊन फ्रान्समध्ये जाऊन राहिले होते. आता ते पुन्हा एकदा त्यांच्या गर्लफ्रेन्डमुळे चर्चेत आले आहेत. ६८ वर्षीय राजा Maha Vijralongkorn यांनी त्यांची ३२ वर्षीय गर्लफ्रेन्ड Sineenat Wongvajripakdi ला खास गिफ्ट दिलं आहे. त्यांनी तिला क्राउन घालून देशाची दुसरी राणी बनवलं आहे. 2 / 9Sineenat Wongvajripakdi ही याआधीही अनेकदा वादात सापडली आहे. तिने २०१९ मध्ये राजाच्या पहिल्या राणीच्या राज्याभिषेकातही अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिला अटकही करण्यात आली होती. पण आता तिच दुसरी राणी झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.3 / 9सिनिनतने थायलॅंडमध्ये एक पायलट म्हणून ट्रेनिंग घेतलं आहे. त्यासोबतच तिने थाई किंगच्या रॉयल बॉडीगार्ड यूनिटमध्येही काम केलं आहे. २०१९ मध्ये तिचं प्रमोशन झालं होतं आणि तिला मेजर जनरल बनवण्यात आलं होतं. आपल्या शानदार करिअरसोबतच तिला काही वादांचा सामना करावा लागला. 4 / 9गेल्या महिन्यात तिचे काही न्यूड सेल्फी लीक झाले होते. अशी चर्चा होती की, थायलॅंडच्या राजाच्या ती जवळची असल्याने मुद्दाम तिचे न्यूड फोटो लीक करण्यात आले होते.5 / 9२१ ऑक्टोबर २०१९ मध्ये राणी सुनिदाच्या राज्याभिषेकावेळी अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने तिच्याकडील मिलिट्री, सरकारी पोजीशन आणि टायटल्स काढून घेण्यात आले होते. गेल्यावर्षी ऑगस्टपर्यंत या महिलेबाबत अनेक अफवा परसत होत्या. 6 / 9यात सांगण्यात आलं होतं की, एकतर तिला तुरूंगात टाकलंय किंवा तिचा मृत्यू झालाय. मात्र, सप्टेंबर २०२० मध्ये तिला तिचे सर्व टायटल आणि रॅंक परत देण्यात आली होती.7 / 9आता या निर्णयानंतर थायलॅंडच्या राजांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. त्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून जनतेच्या आंदोलनांचा सामना करावा लागत आहे. लोकांनी मागणी आहे की, थायलॅंडच्या राजतंत्रात बदल होण्याची गरज आहे. कोरोना काळातही अनेक लोकांनी राजा विरोधात रस्त्यावर आंदोलने केली.8 / 9दरम्यान थायलॅंडच्या राजाने याआधी तीन लग्ने केली आहेत आणि त्यांना सात अपत्ये आहेत. वॅक्सीनला उशीर लागत असल्यानेही त्यांना टीकेचा सामना करावा लागला आहे. 9 / 9थायलॅंड सरकारने नुकतीच घोषणा केली की, देशात एस्ट्राजेनेका वॅक्सीनचे ५० हजार डोज उपलब्ध केले जातील आणि यात हाय रिस्क असलेल्या लोकांना प्राधान्य दिलं जाईल.