Thailand Princess Sirivannavari, Army: फॅशन डिझायनर ते 'आर्मी मेजर जनरल'... देशरक्षणासाठी सज्ज झाली 'राजकन्या'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 17:35 IST
1 / 9Thailand Princess Sirivannavari: थायलंडच्या राजघराण्यात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या राजकुमारी सिरिवन्नावरी नारीरत्न राजकन्या हिला लष्करात मेजर जनलर म्हणून नेमण्यात आले आहे.2 / 9थायलंड मिलिटरी प्रमोशन्समध्ये यंदा राजकुमारीचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे ती आर्मीची मेजर जनरल म्हणजेच प्रमुख असणार आहे.3 / 9राजकुमारी सिरिवन्नावरी हिला फॅशन डिझायनिंगची नेहमीच आवड होती. त्यामुळे तिने राजघराण्यातील असूनही सुरूवातीपासूनच फॅशन डिझायनिंगमध्ये करियरचा विचार आणि हाच व्यवसाय निवडला.4 / 9राजकुमारी सिरिवन्नावरी हिने पॅरिसमधून डिझाइनमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेतले आहे. ती एक ख्यातनाम फॅशन डिझायनर आहे. तिच्या ब्रँडचे नाव सिरिवन्नावरी आहे.5 / 9राजकन्या सिरिवन्नावरी ही १ एप्रिलपासून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. अतिशय सुंदर दिसणारी सिरिवन्नावरी ही थायलंडचा राजा वजिरलंकरन याची धाकटी मुलगी आहे.6 / 9सिरिवन्नावरीची मोठी बहीण राजकुमारी बज्रकितियाभा ही नरेंद्ररा देब्यावती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. हृदयाच्या आजारामुळे ती गेल्या वर्षी डिसेंबरपासून बेशुद्ध आहे.7 / 9राजा वजिरलंकरन यांनी तीन विवाह केले आहेत. त्यांच्या सात मुलांपैकी बज्रकितियाभा हा सर्वात मोठा आहे आणि तीच राजगादीची संभाव्य उत्तराधिकारी होती.8 / 9पण काही विश्लेषकांच्या मते, बज्रकितियाभा हृदयाच्या आजाराने त्रस्त अशून डिसेंबरपासून कोमात गेल्याने आता सिरिवन्नावरी हिला थायलंडचे सिंहासन मिळू शकते.9 / 9सिरीवन्नावरी फॅशन डिझायनर बनण्याआधी एक बॅडमिंटनपटू देखील होती. दक्षिण पूर्व आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांच्या संघाने सुवर्णपदक जिंकले होते. तसेच तिला घोडेस्वारीतही खूप रस आहे.