Thailand's King has married a bodyguard, see wedding photos
थायलंडच्या राजाने केले बॉडीगार्डशीच लग्न, पाहा लग्नसोहळ्याचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 8:45 PM1 / 6थायलॅंडचे राजे वजिरालॉन्कोर्न यांनी आपल्या बॉडीगार्डशी विवाह केला आहे. त्यांनी त्यांच्या पर्सनल बॉडीगार्ड फोर्सच्या डेप्युटी हेड सुथिदासोबत लग्न केले.2 / 6राजघराणे आणि सामान्य जनता यांच्यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने थायलंडचे राजे वजिरालॉन्कोर्न यांनी एक ऐतिहासिक काम केले आहे.3 / 6 राजा वजिरालॉन्कोर्न यांनी सुथिदा तिजाई यांना राणीचा दर्जा दिला आणि आता त्या राज परिवारासोबत राहतील. 4 / 6या विवाहाबाबत काहीच चर्चा झाली नव्हती. बुधवारी अचानक या लग्नाची घोषणा करण्यात आली. थायलंडच्या वृत्तवाहिन्यांवर आधी लग्नाच्या घोषणेची माहिती दिली गेली आणि काही वेळाने राजा - राणीच्या लग्नाचा व्हिडीओ सुद्धा दाखवण्यात आला. 5 / 6राजा वजिरालॉन्कोर्न ६६ वर्षाचे आहेत. २०१७ मध्ये त्यांचे वडील राजा अतुल्यतेज भूमिबोल यांचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांना राजा घोषित करण्यात आलं. 6 / 6राजा वजिरालॉन्कोर्न यांची याआधीही तीन लग्ने झाली आहेत. तसेच त्यांना या तीन पत्नींपासून ७ अपत्ये आहेत. राजा वजिरालॉन्कोर्न आणि सुथिदा यांचा विवाह आधी पारंपरिक पद्धतीने आणि नंतर रजिस्टर करण्यात आला. आणखी वाचा Subscribe to Notifications