The Gaza Strip is an area approximately ten kilometers wide and 41 kilometers long.
४१ किमीच्या गाझा पट्टीसाठी पॅलेस्टाईन-इस्रायलची लढाई; सध्या तिकडे कोणाचं राज्य?,जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 12:53 PM1 / 8पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही बाजूंनी शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या युद्धाच्या घोषणेनंतर इस्रायलचे लष्कर आणि हवाई दल हमासच्या दहशतवाद्यांना धडा शिकवत आहेत. 2 / 8गाझा पट्टीवर सातत्याने रॉकेट हल्ले होत असून त्यावर इस्रायल नेहमीच आक्रमक राहिला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे गाझा पट्टी? आणि यावरून इस्रायल आणि पॅलेस्टाईन अनेक दशकांपासून समोरासमोर का येत आहेत.3 / 8गाझा पट्टी हा इस्रायल, इजिप्त आणि भूमध्य समुद्राच्या मधोमध वसलेला एक छोटासा परिसर आहे, जो जगातील सर्वात दाट लोकवस्तीचा भाग म्हणूनही ओळखला जातो. दहशतवादी इस्लामिक पॅलेस्टिनी संघटना हमास गाझामधूनच इस्रायलवर हल्ले करत आहे. 4 / 8गाझा पट्टी हे अंदाजे दहा किलोमीटर रुंद आणि ४१ किलोमीटर लांबीचे क्षेत्र आहे. येथे २ दशलक्षाहून अधिक लोक राहतात. याचा अर्थ प्रति चौरस किलोमीटर सरासरी ५५०० लोक राहतात. इस्रायलबद्दल बोलायचे झाल्यास, येथे सरासरी लोकसंख्येची घनता सुमारे ४०० लोक प्रति चौरस किलोमीटर आहे, ज्यावरून गाझा किती दाट लोकवस्ती आहे हे समजू शकते.5 / 8पॅलेस्टाईन आणि इतर अनेक मुस्लिम देशांनी इस्रायलला ज्यू राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आहे. १९४७ नंतर, जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाईनची ज्यू आणि अरब राष्ट्रांमध्ये विभागणी केली, तेव्हा पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील संघर्ष सुरूच आहे. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो राज्य म्हणून स्वीकारण्याचा आणि दुसरा गाझा पट्टीचा, जो इस्रायलच्या स्थापनेपासून इस्रायल आणि इतर अरब देशांमधील संघर्षाला कारणीभूत ठरला आहे.6 / 8जून १९६७ च्या युद्धानंतर इस्रायलने पुन्हा गाझा पट्टी ताब्यात घेतली. त्यानंतर २५ वर्षे इस्रायलने आपला ताबा कायम ठेवला. परंतु डिसेंबर १९८७ मध्ये गाझामधील पॅलेस्टिनी लोकांमध्ये दंगली आणि हिंसक संघर्षाने उठावाचे रूप धारण केले. सप्टेंबर २००५ मध्ये, इस्रायलने आपल्या प्रदेशातून माघार पूर्ण केली आणि गाझा पट्टीचे नियंत्रण पॅलेस्टिनी प्राधिकरण (PA) ला दिले. तथापि, इस्रायलने क्षेत्र संरक्षण आणि हवाई गस्त सुरू ठेवली.7 / 8 गाझा पट्टीवर २००७ पासून दहशतवादी इस्लामिक गट हमासचे राज्य आहे. हमासने इस्रायलसोबतची शांतता प्रक्रिया नाकारून आपल्या सनदेत इस्रायलचा नाश करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हमासचे अतिरेकी गाझामधून इस्रायलच्या भूभागावर रॉकेट हल्ले करत आहेत, मात्र हा सर्वात भीषण हल्ला असल्याचे बोलले जात आहे. २००७ मध्ये हमासने गाझा पट्टी ताब्यात घेतल्यापासून, इस्रायलने याकडे 'शत्रूचा प्रदेश' म्हणून पाहिले आहे. इस्रायलचे पाणी, जमीन आणि हवेवर नियंत्रण आहे. तेव्हापासून हमास इस्रायलवर हल्ले करत आहे. यामुळे भूतकाळात २००८-०९, २०१२, २०१४ आणि २०२१ मध्ये इस्रायली सैन्यासोबत चार मोठे लष्करी संघर्ष झाले आहेत.8 / 8युद्धाच्या दुसऱ्या दिवशी, इस्रायली सैन्य आणि हमास या दहशतवादी गट यांच्यात झालेल्या चकमकीमुळे देशभरातील बर्याच भागावर याचा परिणाम झाला. इस्रायलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर, इस्रायलमधील सैनिकांसह किमान ७०० इस्त्रायली ठार झाले आहेत आणि १९०० हून अधिक जखमी झाले आहेत. गाझा पट्टीमध्ये इस्रायली काउंटरच्या हल्ल्यानंतर ४५० हून अधिक मृत्यू झाले आणि सुमारे २३०० जखमी झाले, ज्यामुळे एकूण मृत्यू १००० पेक्षा जास्त झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications