The most expensive country in the world will be shocked to see the prices of essential commodities
जगालीत सर्वात महागडे देश, जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाहून बसेल धक्का, म्हणाल आपला भारतच बरा By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 6:14 PM1 / 7गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात महागाई हा चिंतेचा विषय बनला आहे. पेट्रोल-डिझेलपासून ते दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्वच वस्तूंची महागाई खूप वाढली आहे. महागाई जनतेला अनेक वर्षांपासून त्रस्त करत असली तरी कुठल्याही सरकारला तिच्यावर तोडगा काढता आलेला नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला असा देशांची नावं सांगणार आहोत, जेथील महागाईबाबत ऐकलं तर तुम्हाला भारतातील महागाई ही फारच किरकोळ वाटू लागेल, हे देश पुढीलप्रमाणे 2 / 7स्वित्झर्लंड आपल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र अशा सुंदर देशाला सर्वात महागडा देश म्हणून घोषित करण्यात आले आहे. या देशामध्ये तुम्हाला तुमच्या घरात राहण्यासाठीही कर द्यावा लागतो. येथील रेस्टॉरंट्सपासून ते कपडे, धान्य आदी सर्व गोष्टींनी महागाईची हद्द पार केलेली आहे. 3 / 7निसर्गाची आवड असणाऱ्यांसाठी आइसलँड उत्तम ठिकाण आहे. मात्र येथे घर बांधून राहण्यापेक्षा अन्नधान्य प्रचंड महाग आहे. त्याचं कारण म्हणजे आईसलँडमध्ये बहुतांश अन्नधान्य हे आयात होते. त्यामुळे येथे जेवण खरेदी करणे खूप महाग आहे. 4 / 7नॉर्वे हा सुद्धा एक सुंदर देश आहे. मात्र तेथील कॉस्ट ऑफ लिव्हिंग ऐकून तुम्हाला हे सौंदर्य देखील फिके वाटू लागेल. येथे २५ टक्क्यांपर्यंत व्हॅट आकारण्यात येतो. अन्नधान्यावरही तुम्हाला १५ टक्क्यांपर्यंत कर भरावा लागतो. येथील महागाईमुळे अनेक लोक सीमा पार करून खरेदी करतात. 5 / 7या बेटाचं सौंदर्यसुद्धा लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असते. या ब्रिटिश आयलँडची राजधानी हॅमिल्टन सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. अमेरिकेच्या तुलनेत बर्मुडामधील कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप अधिक आहे. 6 / 7डेन्मार्क हाय-फाय रेस्टॉरंट्ससाठी प्रसिद्ध असलेला डेन्मार्कसुद्धा खूप महागडा देश आहे. येथे दोन व्यक्तींच्या तीन वेळच्या जेवणाची किंमत ही सुमारे ६ हजार ८०० रुपये आहे. येथे तुम्हाला हाय क्वालिटी लाईफ अवश्य मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला तुमचा खिसा खूप रिकामा करावा लागेल. 7 / 7लग्झेम्बर्ग जगातील ८५ टक्के शहरांहून अधिक महाग आहे. येथील अनेकजण आपल्या खरेदीसाठी सीमापार म्हणजेच फ्रान्समध्ये जातात. कारण तिथे दुधापासून बीफपर्यंत सर्व गोष्टी लक्झेम्बर्गच्या तुलनेत खूप स्वस्त आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications