शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नवं आव्हान! चीनमधील युवा लग्नापासून काढतायेत पळ; कारण ऐकून चीन सरकारची झोप उडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 8:20 PM

1 / 10
चीनमध्ये लग्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. २०२४ मध्ये चीनमध्ये लग्न करणाऱ्या युवकांची संख्या मागील १२ वर्षापेक्षा सर्वात कमी राहिली आहे. त्यामुळे चीनमधील जन्मदरही घटला आहे. येणाऱ्या काळात सक्रीय कार्य करणाऱ्या लोकसंख्येवर त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.
2 / 10
चीनची लोकसंख्या वृद्धाप काळाकडे झुकत असतानाच चीनसमोर अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचं नवीन आव्हानही पुढे उभं राहिले आहे. चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, यंदाच्या सहामाहीत लग्न करणाऱ्या जोडप्यांची संख्या २०१३ नंतर पहिल्यांदाच इतक्या खालच्या स्तरावर आली आहे.
3 / 10
लग्न कमी होण्याचं प्रमुख कारण म्हणजे याचे चीनची सुस्त अर्थव्यवस्था आणि राहणीमानाचा वाढता खर्च. अशा परिस्थितीत, बहुतेक तरुण लग्नाचं प्लॅनिंक करण्याचं पुढे ढकलत आहेत कारण ते स्वतःला अधिक जबाबदाऱ्या घेण्यास सक्षम समजत नाहीत.
4 / 10
जर लग्न कमी झाले तर जन्मदरावरही त्याचा परिणाम होतो. मुलं जन्माला न आल्याने देशातील जन्मदर घसरेल. लग्नापासून पळ काढणारे युवा आणि घसरता जन्मदर यामुळे चीन सरकारची चिंता आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
5 / 10
एकीकडे सरकार लोकसंख्या वाढीसाठी विविध कार्यक्रम, योजना हाती घेतंय मात्र युवकांमध्ये लग्न न करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. चीनमध्ये विवाह नोंदणी आकडेवारीनुसार, यंदाच्या सहामाहीत एकूण ३४ लाख जोडप्यांनी लग्न केले आहे.
6 / 10
तर २०२३ च्या पहिल्या सहामाहीत जवळपास ३९ लाख जोडप्यांची लग्न झाली होती म्हणजे यंदाच्या सहामाहीत ५ लाखांहून कमी लग्न जानेवारी ते जून या दरम्यान झाले आहे. लग्न कमी झाल्यामुळे चीन सरकारच्या लोकसंख्या वाढीच्या योजनांना ब्रेक लागू शकतो.
7 / 10
चीनमध्ये मुल जन्माला घालण्यासाठी लग्न करणं बंधनकारक आहे. ज्यात आई वडिलांना त्यांच्या मुलाची जन्म नोंदणी आणि सरकारी फायदे घेण्यासाठी मॅरिज सर्टिफिकेट असणं गरजेचे असते. परंतु जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये हळूहळू नोकऱ्या कमी होत आहेत त्यामुळे युवकांना त्यांच्या भवितव्याची चिंता आहे.
8 / 10
नोकरी नसणे, खर्च वाढणे या राहणीमानामुळे चीनच्या युवकांचा कल लग्न न करण्याकडे आहे. एकतर युवा राहणे किंवा उशीरा लग्न करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. चीनमध्ये २०१४ पासून लग्न करणाऱ्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे.
9 / 10
कोविड काळानंतर लग्न करणाऱ्यांची संख्या वाढली होती परंतु त्यानंतर आता पुन्हा विवाह नोंदणी कमी होत चालली आहे. यंदाचा लग्नाचा दर हा १९८० नंतर सर्वात कमी राहू शकतो असा चीनमधील तज्ज्ञांचा अंदाज आहे.
10 / 10
विवाह नोंदणीत झालेल्या घटीमुळे युवकांच्या लोकसंख्येतही घट होत आहे. त्यात विवाह योग्य असलेल्या लोकसंख्येत महिलांच्या तुलनेने पुरुषांची संख्या अधिक आहे. त्यात लग्नासाठी लागणारा खर्चही लग्न न करण्यामागचे एक कारण आहे. आता चीनमधील जन्मदर घटत असल्याने ते रोखण्यासाठी मोठी पाऊले उचलणं गरजेचे आहे असा सल्ला चीन सरकारला तज्ज्ञ देत आहेत.
टॅग्स :chinaचीनmarriageलग्न